अंगावर ऑईल फेकून शेतकऱ्याचे ७८ हजार पळवले, हळद विक्रीतून मिळाली होती रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:54 IST2023-01-31T17:54:21+5:302023-01-31T17:54:21+5:30
काही कळायच्या आत दोन्ही चोरटे रक्कम घेऊन दुचाकीवरून पसार झाले.

अंगावर ऑईल फेकून शेतकऱ्याचे ७८ हजार पळवले, हळद विक्रीतून मिळाली होती रक्कम
- इस्माईल जहागिरदार
वसमत: अंगावर अॉईल फेकून ६६ वर्षीय शेतकऱ्याचे ७८ हजार ५०० रुपये पळवल्याची घटना शहरातील महाविर चौकात आज दुपारी घडली. चोरट्यांनी दुचाकीवरून सिनेस्टाईल पसार झाले. ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर घडली.
वसमत तालुक्यातील सातेफळ येथील शेतकरी नंदु स्वामी यांनी आज दुपारी बॅंकेतून ७८ हजार ५०० रुपये रक्कम काढली. दुपारी १ वाजेच्या सुमारास रक्कम घेऊन ते चालतच महाविर चौकाकडे निघाले. दरम्यान, पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या अंगावर अॉईल फेकले. अंगावर काय पडले हे पाहत स्वामी थांबले. ऑइल पुसत असतानाच दुचाकीवरील दोघांनी स्वामी यांना पकडून त्यांच्याकडील संपूर्ण रक्कम पळवली.
काही कळायच्या आत दोन्ही चोरटे ७८ हजार ५०० रुपयांची रक्कम घेऊन दुचाकीवरून पसार झाले. स्वामी यांनी लागलीच शहर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोनि चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम, शेख नय्यर,कृष्णा चव्हाण यांच्यासह पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत आहे.