शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

२८ लाखांची खंडणी मागितली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:02 AM

वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना येथून एकाला २८ डिसेंबर रोजी क्रूझर जीपमध्ये डांबून त्याचे अपहरण करण्यात आले असू, त्याच्या पत्नीला मोबाईलवरून २८ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. १० वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराच्या वादातून हे प्रकरण घडले आहे. या प्रकरणी कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना येथून एकाला २८ डिसेंबर रोजी क्रूझर जीपमध्ये डांबून त्याचे अपहरण करण्यात आले असू, त्याच्या पत्नीला मोबाईलवरून २८ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. १० वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराच्या वादातून हे प्रकरण घडले आहे. या प्रकरणी कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुरूंदा शिवारातील टोकाई कारखाना येथे कैलास राठोड, त्यांची पत्नी हे किराणा दुकान टाकून उदरनिर्वाह करतात. फिर्यादी हा पळसोना ता.हिंगोली येथील रहिवाशी आहे. फिर्यादीच्या पत्नीने १० वर्षापूर्वी २० बैलबंडी ऊस तोडीकरिता लावून देण्यासाठी ५ लाख रुपये घेतले होते. त्यावेळेस ठरल्याप्रमाणे २० बैलबंडी लावून देण्यात आले. या घटनेतून तब्बल १० वर्षानंतर आरोपी दिलीप उघडे व इतर चार जणांनी संगनमत करून क्रूझर जीपमध्ये टोकाई कारखाना येथून फिर्यादीचा पती कैलास राठोड यास उचलून नेऊन त्याचे अपहरण केले. ही घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली होती. फिर्यादीने त्यावेळेस अर्ज दिला होता. परंतु मोबाईलवरून फिर्यादीस तुझा पती पाहिजे असेल तर २८ लाख रुपये आणून दे, अन्यथा तुझ्या पतीला जिवे मारतो, अशी धमकी दिली होती. फिर्यादीच्या पतीला डांबून खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे.फिर्यादी शीलाबाई कैलास राठोड (४२, रा.पळसोना ता.जि.हिंगोली ह.मु. टोकाई कारखाना) यांच्या फिर्यादीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी दिलीप हरिभाऊ उघडे (रा. बोडखा ता.धारूर जि.बीड) व इतर चार जण एकूण पाच जणाविरोधात कलम ३६१ अ, ५०६,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि शंकर वाघमोडे, जमादार बी.टी.केंद्रे, पोना आडे हे करीत आहेत.अपहरण झालेल्या इसमाचा अद्याप शोध लागला नसून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत.अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी धारूरला पोलीस पथक जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे मात्र येथील परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.वसमत येथे तरूणाची आत्महत्यावसमत : येथील आंबेडकर नगर भागातील रहिवाशी २८ वर्षीय युवकाने राहत्या घरात शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी वसमत शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसमत शहरातील आंबेडकर नगर येथील सिद्धार्थ (पिंटू) जळबाजी दातार (२८) या तरूणाने ४ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर वेळ निश्चित नाही, साडीने घरातच गळफास घेतला. सदर तरूण घरात एकटाच राहत असे. दुपारी त्याचा जेवणाचा डबा घेवून आलेल्या भाच्यास हा प्रकार समजला. याप्रकरणी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी