१५०० कर्मचारी कायम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:18 IST2019-01-08T23:18:20+5:302019-01-08T23:18:50+5:30
राज्यातील नगर पालिका नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात १ जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. १ जानेवारी रोजी शासनासोबत झालेल्या तडजोडीनुसार त्यातील प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील १५०० रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत ८ जानेवारी रोजी घेण्यात आला.

१५०० कर्मचारी कायम होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील नगर पालिका नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात १ जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. १ जानेवारी रोजी शासनासोबत झालेल्या तडजोडीनुसार त्यातील प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील १५०० रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत ८ जानेवारी रोजी घेण्यात आला.
तसेच नगर परिषदामधील स्वच्छता निरीक्षकांचा राज्यस्तरीय संवर्ग निर्माण करण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास २५० ते ३०० स्वच्छता निरीक्षक हे शासकीय कर्मचारी होणार आहेत.
उर्वरित मागण्यासंदर्भात शासनासोबत झालेल्या तडजोडीनुसार इतिवृत्तांमध्ये नमूद केल्यानुसार लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास संघर्ष समितीचे प्रमुख विश्वनाथ घुगे यांनी व्यक्त करून मुख्यमंत्री, राज्यमंत्री नगर विकास विभाग, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर तसेच आयुक्त शंकर नारायण यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.