कोल्हापूरमध्ये दारू खरेदी करताना हाणामारी, दगडफेक; तळीरामावर लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:47 IST2020-05-04T18:46:53+5:302020-05-04T18:47:40+5:30

तेथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून त्या युवकांच्या दोन गटात जुना वाद उफाळून आला. वादावादीचा प्रकार मारहाणी पर्यंत गेला. पोलिसांनी सौम्य लाठीमार हल्ला करीत सर्वांनाच तेथून पांगवले.

Fighting, stone throwing while buying Kolhapur liquor | कोल्हापूरमध्ये दारू खरेदी करताना हाणामारी, दगडफेक; तळीरामावर लाठीमार

कोल्हापूरमध्ये दारू खरेदी करताना हाणामारी, दगडफेक; तळीरामावर लाठीमार

कोल्हापूर : दारू खरेदी करताना दोन गटात हाणामारी, दगडफेक चा प्रकार प्रकार घडला, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तळीरामावर लाठीमार केल्याने पुढील अनर्थ टळला. हा प्रकार शनिवार पेठेत महापालिकेनजीक सोमवारी सायंकाळी घडला.

दारू घेण्यासाठी आपल्या परिसरात आलेल्या एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली शनिवार पेठेत सायंकाळी ही घटना घडली पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत ही परिस्थिती नियंत्रणात आणली.

रंकाळा वेश परिसरात मावा घेण्यासाठी गेल्यानंतर तेथे एक युवक महाराणा प्रताप चौक परिसरातील तरुणांना दम देतो. तोच युवक आज दारू घेण्यासाठी शनिवार पेठ परिसरातील एका दुकानात आला होता. तेथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून त्या युवकांच्या दोन गटात जुना वाद उफाळून आला. वादावादीचा प्रकार मारहाणी पर्यंत गेला. पोलिसांनी सौम्य लाठीमार हल्ला करीत सर्वांनाच तेथून पांगवले. याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यांमध्ये सुरू आहे.

Web Title: Fighting, stone throwing while buying Kolhapur liquor