कमी वयात 'या' जीवघेण्या आजारांचे शिकार ठरत आहेत तरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 04:42 PM2019-11-21T16:42:29+5:302019-11-21T17:00:05+5:30

सध्याचा काळात आजारपण हे जेष्ठांसह तरूणांमध्ये ही उद्भवतात. जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे.

young generation suffering from these diseases | कमी वयात 'या' जीवघेण्या आजारांचे शिकार ठरत आहेत तरुण

कमी वयात 'या' जीवघेण्या आजारांचे शिकार ठरत आहेत तरुण

Next

(image credit -ibelieve.com)

 सध्याचा काळात आजारपण हे जेष्ठांसह तरूणांमध्ये ही उद्भवतात. जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे. ते आजकाल तरुण पिढीत सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आहेत. बदलत चाललेली जीवन शैली, आणि खाण्या पिण्याच्या सवयी यांमुळे तरुणांमध्ये आजार उद्भवत आहेत. त्यामुळे २५ वयापासूनच तरुणांनी सर्तक राहायला हवे.

(Image credit_talkspace.com)

1) शाळा, महाविद्यालयातील मुलांना फास्टफुड जास्त खाल्ल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. चविष्ट आणि तिखट चवीच्या या पदार्थांचे सेवन लवकर थांबवले नाही. तर विविध आजारांनी शरीराला अपाय होऊ शकतो. दिनचर्येत नियमित फास्टफूडचा वापर होत असल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतात. यासाठी फास्टफूड खाणे टाळले पाहिजे फास्टफूड पदार्थ हे तिखट आणि अतितेलकट असल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकते. यामुळे अ‍ॅसिडीटीसारखा त्रास जास्त वाढतो. शिवाय यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

(image credit- moldbgonega.com)

२) साधारणपणे २२ ते ३०  वयातील मुलांमध्ये हृदय विकाराच्या झ़़टक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यांसारख्या समस्यांपासून वाचायचे असेल तर महिन्यातू़न किमान एकदा मेडीकल टेस्ट करणे गरजेचे आहे. त्याचजोडीला जीवनशैलीत बदल केला तर आजारांपासून मुक्तता होईल.

(image credit -.inverse.com)

३) रक्तदाबासंबंधीत आजार हे तरुणांमध्ये दिसून येत आहे. अपुरी झोप, ताण- तणाव यांमुळेही आजार वाढीस लागत आहे. रक्तदाब वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे न घेणे. असे आढळून आले आहे की या समस्येवर ५ पैकी एका व्यक्तीवर उपचार करण्यात येतात व त्यापैकी फक्त ५ टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात असतो. त्यामुळे जर तुम्हाला उच्चरक्तदाबाची  समस्या असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर औषधं घेणे गरजेचे आहे.

(image credit-guideposts.org)

४) तरुण मुलांमध्ये आजारपणा जास्त असण्याचे मुख्य कारण डिप्रेशन आहे. दैनंदिन कामाचा आणि नातेसंबंधांमधील तणाव, नोकरीच्या समस्या, भविष्याचे, मुलांसाठीचे नियोजन यातला तणाव या वयात  दिसतो.

Web Title: young generation suffering from these diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.