दही-भात खाण्याचे हे जबरदस्त फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्यावर ठरतो रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 12:46 IST2024-01-11T12:46:02+5:302024-01-11T12:46:29+5:30

Curd-Rice Health Benefits : तुम्ही जर भातासोबत दही खाल्लं तर वजन वाढण्याऐवजी कमी होण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊ दही-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

You will be speechless after reading these amazing benefits of eating curd and rice you should know | दही-भात खाण्याचे हे जबरदस्त फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्यावर ठरतो रामबाण उपाय

दही-भात खाण्याचे हे जबरदस्त फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्यावर ठरतो रामबाण उपाय

Curd-Rice Health Benefits : बरेच लोक आवडीने दही किंवा दह्याचे वेगवेगळे पदार्थ खातात. तसेच दह्याचे आरोग्याला होणारे वेगवेगळे फायदेही अनेकांना माहीत असतात. पण अनेकांना दही-भात खाण्याचे फायदे माहीत नसतील. जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, भात खाल्ल्याने वजन वाढतं. पण तुम्ही जर भातासोबत दही खाल्लं तर वजन वाढण्याऐवजी कमी होण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊ दही-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

पोटदुखीवर उपाय

भातात मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम अधिक प्रमाणात आढळतात. यामुळे पोटाचं दुखणं दूर होतं. दही आणि भात खाल्याने मासिकपाळीच्या आधी होणारा त्रासही कमी होतो. 

पचनक्रिया सुधारते

दक्षिण भारतातील लोक दही-भात जेवणाच्या शेवटी खातात. कारण याने जेवण पचायला मदत होते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात ज्याने तुम्हाला जेवण पचायला सोपं जातं. 

वजन होईल कमी 

तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर दही-भात खायला हवा. याचं नियमितपणे सेवन केल्याने एक ते दोन महिन्यात फरक दिसेल. कारण यात कॅलरी असतात त्यामुळे दही-भात तुम्ही बिनधास्त होऊन खाऊ शकता. 

शरीराचं तापमान

दक्षिण भारतात दही-भात जास्त प्रमाणात खातात याचं कारण म्हणजे तिथे वर्षभर गरम वातावरण असतं. दही-भात शरीराचं तापमान कमी करण्यास मदत करतो. तुम्ही दही-भात कोणत्याही गरम जेवणानंतर खाऊन बघा तुम्हाला थंड वाटेल. 

प्रोटीन अधिक मिळतं

दह्याध्ये कॅल्शिअमसोबतच प्रोटीनचं प्रमाणही अधिक असतं. दही हे एक चांगल अॅंटीऑक्सीडेंटही आहे. त्यामुळे दही-भात एकत्र खाल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. 

रोगप्रतिकारशक्ती वाढते

दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. याने शरीराला वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची ताकद मिळते. त्यामुळे जितका जास्त दही-भात खाल त्याचा फायदा होईल. 

Web Title: You will be speechless after reading these amazing benefits of eating curd and rice you should know