उशीखाली लसूण ठेवण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्....मच्छर, डासही दूर राहतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:31 IST2021-05-18T15:25:51+5:302021-05-18T16:31:04+5:30
रोज लसणीच्या पाकळ्या उशीखाली ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे तुम्हीही वाचून अवाक् व्हाल...

उशीखाली लसूण ठेवण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्....मच्छर, डासही दूर राहतील
लसणात अनेक गुणधर्म असतात. सर्दीवर तर लसूण रामबाण उपाय आहे. रोज लसणीच्या पाकळ्या उशीखाली ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे तुम्हीही वाचून अवाक् व्हाल...
मच्छर, माशा दूर राहतात
लसणात असे गुणधर्म आहेत ज्यामुळे मच्छर आणि माशा दूर राहतात. लसणात अशी विषद्रव्ये असतात की जे मच्छर, माशांसाठी हानीकारक असतात. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेवा अन् माशा, मच्छर दूर पळवा.
इम्युननिटी बुस्टर
लसणाच्या पाकळ्यांमध्ये असे गुणधर्म आहेत जे कोविड काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवतात. लसणात अॅलिसिन असते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या घटकामुळे रोग शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं आहे.
सर्दीचा त्रास होत नाही
लसणातील या अॅलिसिनमुळेच सर्दीचा त्रास होत नाही. रोज लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेवा. सर्दी तर दूरच इतर रोगही तुमच्या आसपास फिरकणार नाहीत.
शांत झोप लागते
लसणात व्हिटॅमिन बी १ व बी ६ असते या दोन्ही व्हिटॅमिनचा आपल्या झोपेवर प्रभाव होतो. व्हिटॅमिन बी १ मुळे रात्रीची शांत झोप लागते तर व्हिटॅमिन बी ६ इनसोमानिया या आजारावर गुणकारी आहे. लसणामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना दूर ठेवता तसेच मानसिक आजारांपासूनही दूर राहता.
(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)