Instagram वर रील्स पाहण्याचं व्यसन? काळजी घ्या नाहीतर करावा लागेल गंभीर आजारांचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 18:18 IST2025-01-12T18:17:33+5:302025-01-12T18:18:12+5:30
बस, ट्रेन, मेट्रो, घरात, कुटुंबात किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना एक सामान्य सवय असते ती म्हणजे प्रत्येकजण त्यांच्या फोनमध्ये व्यस्त असतो.

Instagram वर रील्स पाहण्याचं व्यसन? काळजी घ्या नाहीतर करावा लागेल गंभीर आजारांचा सामना
इन्स्टाग्राम रील्स स्क्रोल करणं, सोशल मीडियावर मीम्स शेअर करणं, सोशल प्रोफाइल अपडेट आणि रील-लाइफची वास्तविक जीवनाशी तुलना करणं आता सामान्य झालं आहे. सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. ज्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
बस, ट्रेन, मेट्रो, घरात, कुटुंबात किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना एक सामान्य सवय असते ती म्हणजे प्रत्येकजण त्यांच्या फोनमध्ये व्यस्त असतो. तासन्तास फोन स्क्रोल करण्याची आणि इन्स्टा रील्स पाहण्याची सवय आजकाल लोकांना इतकी जडली आहे की, त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
'या' आजारांचा धोका
ज्या लोकांना फोन पाहण्याची जास्त सवय आहे त्यांनी झोप न लागणे, डोकेदुखी, मायग्रेन इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही झोपत असाल तर तुम्हाला रीलबाबतची स्वप्नं पडतील. रील पाहण्याची ही सवय केवळ तरुणांमध्येच दिसून येत नाही तर १० ते ५५ वयोगटातील लोकांमध्येही दिसून येते. ज्यामुळे मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत.
रील्स पाहण्याचे तोटे
सुरुवातीच्या तपासणीदरम्यान लोकांनी सांगितलं की, ते सुमारे दीड वर्षांपासून रील पाहत आहेत. ज्यामध्ये ते सकाळी उठल्याबरोबर रील पाहण्यास सुरुवात करतात आणि रात्रीपर्यंत रील पाहत राहतात. त्याच वेळी, काही लोकांनी त्यांना व्हॉट्सअॅपवर शेअर केलेले रील्स पाहणं आवडतं असं म्हटलं आहे. जर ते रील पाहत नसतील तर त्यांना विचित्र वाटू लागतं.
'या' समस्यांचा करावा लागेल सामना
- डोळे खूप दुखतात.
- तीव्र डोकेदुखी
- झोप न येणे
- जेवणाच्या वेळा न पाळणे
रील्स पाहण्याचे व्यसन एखाद्या आजारापेक्षा कमी नाही.
असं करा स्वतःचं रक्षण
- जर तुम्हाला या आजारापासून दूर राहायचे असेल तर दररोज कमी रील्स पाहण्याचा प्रयत्न करा.
- गरज असेल तेव्हाच फक्त मोबाईलचा वापर करा.
- विविध पुस्तकं वाचायला सुरुवात करा.
- मित्र आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा.
- वेळ असेल तेव्हा मोकळ्या हवेत फिरायला जा.