शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

चुकीची लाइफस्टाइल उडवेल तुमची झोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 7:36 PM

मानसिक, शारीरिक स्थितीवरही होईल विपरित परिणाम..

ठळक मुद्देस्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना निद्रानाशाचा विकार मोठ्या प्रमाणात होतो, असं संशोधकांना आढळून आलंय.त्याचं ठोस आणि नेमकं कारण मात्र संशोधकांना सापडू शकलं नाही. त्यावर त्यांचं अद्याप संशोधन सुरू आहे.चुकीची लाइफस्टाइल आणि खूप काळ कुठली औषधं घेत असाल, तर त्यानंही निद्रानाश आणि नैराश्य येऊ शकतं.

- मयूर पठाडेरात्री बेरात्री झोपेतून उठणं, सारखी सारखी झोप डिस्टर्ब होणं, अगोदर झोपेचा त्रास सुरू होणं, नंतर निद्रानाशात त्याचं रुपांतर होणं आणि रात्री झोपेत अधून मधून काही क्षणांसाठी थेट श्वासच बंद होणं, नंतर पुन्हा सुरू होणं असे प्रकार अनेकांमध्ये दिसून येतात. तुमची चुकीची लाइफस्टाइल हे त्याचं कारण असू शकतं. झोपेच्या या त्रासाबाबत वेळीच काळजी घेतली नाही, तर हा विकार वाढत जातो आणि नैराश्यानं ती व्यक्ती ग्रासली जाते.आॅस्ट्रेलियाच्या संशोधकांनी नुकतंच यावर मोठं संशोधन केलं आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हा विकार मोठ्या प्रमाणात होतो, असं संशोधकांना यात आढळून आलंय. पुरुषांनाच याचा जास्त त्रास का, झोपेच्या तक्रारी वाढत जाऊन मोठ्या होतात आणि नैराश्यात त्याचं रुपांतर कसं होतं, याचं ठोस आणि नेमकं कारण मात्र त्यांना सापडू शकलं नाही. त्यावर त्यांचं अद्याप संशोधन सुरू आहे.डॉ. कॅरोल लॅँग हे त्यातले प्रमुख संशोधक असून त्यांचं म्हणणं आहे, झोपेच्या तक्रारींकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका, नाहीतर रात्रीची ही जागरणं तुमची केवळ झोपच नाही, तर तुमचं सारं आयुष्यच बेचव करेल, नासवून टाकेल.प्रमाणाबाहेर कष्ट झाल्यामुळे झोप येत नाही, त्यामुळे झोपेच्या तक्रारी वाढतात, पण फार शारीरिक कष्ट तुम्ही करीत नसतानाही तुमच्या झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या असतील, तर निद्रानाशाकडे तुमची वाटचाल होते. झोपेत मध्येच काही क्षणांसाठी श्वास बंद होणे, सुरू होणे असे प्रकार सुरू होतात आणि त्यानंतर गंभीर स्वरुपाच्या नैराश्याकडे तुमची वाटचाल होऊ शकते. मानसिक आणि शारीरिक तक्रारी वाढत जातात. रात्री झोप न आल्यामुळे आपोआपच तुमची विश्रांती होत नाही आणि तुम्हाला थकल्यासारखं, लिथार्जिक वाटतं.नुकतंच झालेलं हे संशोधन आणि यापूर्वीची संशोधनंही सांगतात, तुम्हाला खूप ताण असला, सततच्या काळजीनं तुम्ही ग्रस्त असाल, तुमची लाइफस्टाइल चुकीची असेल आणि काही वेळा, तुम्ही सातत्यानं तुमच्या काही आजारांसाठी औषधं घेत असाल तर त्यामुळेही तुमच्या झोपेच्या तक्रारी वाढतात आणि त्यानंतर त्या वाढत जाऊन नैराश्यात त्याचं रुपांतर होतं.