शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

World Vitiligo Day : पांढरे कोड नाहीत कलंकित, सर्व गैरसमज दूर करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 17:03 IST

आपल्या त्वचेला आणि केसांना रंग प्राप्त होतो तो मेलॅनिनमुळे आणि जेव्हा मेलॅनिन निर्माण करणाऱ्या पेशींचे कार्य थांबते किंवा त्या पेशी नष्ट होतात तेव्हा पांढरे कोड उत्पन्न होते.  कोणत्याही प्रकारची त्वचा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत पांढऱ्या कोडाची समस्या उद्भवू शकते.

पांढरे कोड ही स्वयंप्रतिकारामुळे (ऑटोइम्युन) निर्माण होणारी त्वचा समस्या आहे, ज्यामध्ये त्वचेतील रंगपेशी नष्ट होतात.  त्यामुळे त्वचेवर सफेद पट्टे दिसू लागतात.  हे शरीराच्या कोणत्याही भागावरील त्वचेवर होऊ शकते.  केसावर परिणाम होऊन केस पांढरे होऊ शकतात आणि तोंडाच्या आत देखील हे होऊ शकते. आपल्या त्वचेला आणि केसांना रंग प्राप्त होतो तो मेलॅनिनमुळे आणि जेव्हा मेलॅनिन निर्माण करणाऱ्या पेशींचे कार्य थांबते किंवा त्या पेशी नष्ट होतात तेव्हा पांढरे कोड उत्पन्न होते.  कोणत्याही प्रकारची त्वचा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत पांढऱ्या कोडाची समस्या उद्भवू शकते.

पांढऱ्या कोडाच्या समस्येमागचे नेमके कारण अद्यापही समजलेले नाही.  शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेमधील बदल, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ही समस्या असणे किंवा रोगप्रतिकार क्षमतेशी संबंधित इतर आजार जसे हायपरथायरॉइडिजम, एलोपेशिया एरेटा (केस प्रचंड प्रमाणात गळणे) आणि अतिशय गंभीर ऍनिमिया असणे यांचा संबंध पांढरे कोड होण्याशी असण्याची शक्यता असते.

ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते पण सर्वसामान्यतः तिची सुरुवात ३० वर्षे वयाच्या आधी होते.  काही बाबतीत चेहरा, हात, पावले, डोळे, नाक आणि कान या अवयवांवर पांढरे कोड येते, त्याला अक्रोफेशियल व्हिटीलीगो म्हणतात.  जेव्हा त्वचेच्या संपूर्ण पृष्ठभागावर पांढरे कोड येते तेव्हा त्याला सर्वत्र पसरलेला व्हिटीलीगो असे म्हणतात.  सेगमेंटल व्हिटीलीगोमध्ये त्वचेच्या फक्त एका बाजूला किंवा एकाच भागावर पांढरे कोड येते.  जेव्हा फक्त काही जागी त्वचेवरील रंग गेल्यासारखे दिसते तेव्हा त्याला लिमिटेड किंवा सेंट्रल व्हिटीलीगो म्हणतात.  ही समस्या कशी वाढेल याचे अनुमान करणे कठीण असते.  काहीवेळा पांढरे कोड वाढत राहते आणि सर्वत्र पसरते.  तर काहीवेळा काहीही उपचार न करता देखील पांढरे चट्टे येण्याचे थांबते.  कधी कधी काही केसेसमध्ये त्वचेचा मूळ रंग परत देखील येतो.

पांढऱ्या कोडावरील उपचार काही वेळा असमाधानकारक ठरतात.  चेहरा आणि धडासाठी रिपिगमेंटेशन उपचार सर्वोत्तम असतात; हात, पाय आणि सफेद केस असलेल्या भागांवरील उपचारांना पुरेशी प्रतिक्रिया मिळत नाही.  पांढरे चट्टे नवीन असतील तर उपचारांचा परिणाम लवकर दिसून येतो तर जुन्या चट्ट्यांच्या बाबतीत वेळ लागू शकतो.

त्वचेवर जखमा होऊ न देणे, संरक्षक कपडे घालणे, त्वचेवर ओरखडे आणि त्वचा कापली जाणे टाळणे अशा प्रकारे काळजी घेतल्यास या आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. या समस्येवरील उपचारांमध्ये प्रामुख्याने स्टिरॉइड्स असलेली टॉपिकल क्रीम्स, कॅल्सेन्यूरिन इन्हिबिटर्स, फोटोथेरपी यांचा समावेश असतो.  तसेच काही विशिष्ट मेलॅनोसाइट पेशींच्या प्रत्यारोपणाचा समावेश असलेले विविध सर्जिकल उपचार देखील आहेत, तसेच वेगवेगळे ग्राफ्टिंग पर्याय पण आहेत.

पांढरे कोड ही समस्या जीवघेणी किंवा संसर्गजन्य नाही. ही समस्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होते असा एका गैरसमज आहे. आंबट पदार्थ, मासे, सफेद खाद्यपदार्थ इत्यादींमुळे पांढरे कोड होते असा लोकांचा समज असायचा. पण हा समज खरा असल्याचे सिद्ध करणारा कोणताही शास्त्रीय पुरावा सापडलेला नाही.  पांढऱ्या कोडामुळे व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये बाधा येऊ शकते, खास करून गहूवर्णीय किंवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीच्या बाबतीत ही समस्या अधिक अडचणीची ठरू शकते.  यामुळे त्या व्यक्तीवर मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी पांढरे कोड असणाऱ्या व्यक्तींना कलंकित मानले जाण्याच्या  घटना देखील घडतात.

-डॉ. तृप्ती डी अगरवाल, कन्सल्टन्ट डर्मेटोलॉजिस्ट, ट्रीकोलॉजिस्ट व अएस्थेटिक डर्मेटोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स