'प्लाज्मोडियम' नावाच्या पॅरासाइटने होणारा आजार म्हणजे मलेरिया. हा आजार मादा 'एनाफिलीज' डास चावल्याने होतो, हे डास घाणेरड्या पाण्यात वाढतात. हे डास सामान्यपण रात्रीच्या वेळी अधिक चावतात. काही केसेसमध्ये मलेरिया आतल्या आत वाढत राहतो. अशात ताप जास्त न येता कमजोरी अधिक जाणवू लागते आणि एका स्टेजला रुग्णामध्ये हीमोग्लोबिनही कमी होतं.
२५ एप्रिलला वर्ल्ड मलेरिया डे
२५ एप्रिलला जगभरात वर्ल्ड मलेरिया डे पाळला जातो. तसा तर मलेरिया सामान्यपणे पावसाळ्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान अधिक पसरतो. मलेरियात प्रत्येक व्यक्तीचं शरीर कसं रिअॅक्ट करणार यांचं प्रमाण वेगवेगळं ठरतं. जर एखाद्या व्यक्तीचं इम्यून सिस्टीम मजबूत असेल तर कदाचित त्याला डास चावल्यावरही काही होणार नाही. पण दुसऱ्या व्यक्तीसाठी मलेरिया जीवघेणा ठरु शकतो.
भारतातील स्थिती
एका रिपोर्टनुसार, भारतात दरवर्षी जवळपास १८ लाख लोकांना मलेरिया आजाराचा सामना करावा लागतो. संपूर्ण जगात मलेरियाने प्रभावित देशांपैकी ८० टक्के केसेस भारत, इथियोपिया, पाकिस्तान आणि इंडोनेशियामध्ये आढळतात. भारतात ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि मेघालय राज्यांमध्ये मलेरियाची सर्वात जास्त प्रकरणे बघायला मिळतात. वर्ल्ड मलेरिया रिपोर्टनुसार, मलेरियाचे टाइप पी विवेक्समध्ये संपूर्ण जगात ८० टक्के केसेस जास्तीत जास्त तीन देशात बघायला मिळतात. त्यात भारताचाही समावेश आहे.
मृत्यूच्या आकडेवारीत कमतरता
नवाभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या एका रिपोर्टनुसार, २०१४ मध्ये देशभरात मलेरियाच्या ११ लाख २ हजार २०५ केसेस समोर आल्या होत्या. २०१६ मध्ये ही संख्या १० लाख ५ हजार ९०५ इतकी झाली. पण २०१५ मध्ये ही संख्या वाढून ११ लाख ६९ हजार २६१ झाली होती. मलेरियाने मृत्यूच्या आकडेवारीवर नजर टाकली तर बघायला मिळतं की, २०१४ मध्ये मलेरियाने ५६२ मृत्यू झाले होते तर २०१५ मध्ये ३८४ आणि २०१६ मध्ये २४२ मृत्यू झाले होते.
मलेरियाची लक्षणे
मलेरियामध्ये सामान्यपणे एक दिवसाआड ताप येतो आणि रुग्णाला तापासोबतच थंडीही वाजते. अजूनही काही लक्षणे बघायला मिळतात.
- अचानक थंडी वाजून ताप येणे आणि नंतर गरमी वाटणे व ताप येणे.
- घामासोबत ताप कमी होणे आणि कमजोरी जाणवणे.
- दोन ते तीन दिवसांनी ताप येत राहणे.
कसा करावा बचाव?
- ब्लड टेस्ट करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतही औषध घेऊ नका.
- जर औषधांचा पूर्ण डोज घेतला नाही तर मलेरिया पुन्हा होण्याचा धोका असतो.
- रुग्णाला मच्छरदानीमध्ये ठेवा. कारण डास जर रुग्णाला चावून घरातील इतर कुणाला चावेल तर त्यांना हा आजार होऊ शकतो. रुग्णाला ताप आल्यावर ७ दिवसांपर्यंत शरीरात व्हायरस कायम राहतो. जर रुग्णाला व्हायरल आहे तर त्यांच्या वस्तूंचा वापर करु नका.
(टिप : वरील सल्ले किंवा मुद्दे हे माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याकडे प्रोफेशनल सल्ले म्हणूण बघू नका. तुम्हाला काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)