World Hearing Day : WHO ने दिला इशारा, २०५० पर्यंत ७० कोटी लोकांना येऊ शकतो बहिरेपणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:01 PM2021-03-03T16:01:52+5:302021-03-03T16:07:13+5:30

World Hearing Day: यावर्षी हेअरिंग डे च्या थीमचं नाव हे Hearing care for All-Screen. Rehabilitate. Communicate. हे पहिल्यांदाच होणार आहे की, ऐकण्याच्या शक्तीबाबत  जगात पहिल्यांदा कुणी रिपोर्ट लॉन्च करणार आहे. 

World Hearing Day: Nearly 700 million people will experience hearing loss by 2050 warns who | World Hearing Day : WHO ने दिला इशारा, २०५० पर्यंत ७० कोटी लोकांना येऊ शकतो बहिरेपणा...

World Hearing Day : WHO ने दिला इशारा, २०५० पर्यंत ७० कोटी लोकांना येऊ शकतो बहिरेपणा...

googlenewsNext

World Hearing Day : आज जगभरातील साधारण ४०० मिलियन लोकांनी आपली ऐकण्याची शक्ती गमावली आहे. इतकेच नाही तर ऐकण्याच्या शक्तीबाबत वर्ल्ड हेअरिंगचा रिपोर्ट तर अधिक धक्कादायक आहे. या रिपोर्टनुसार २०५० पर्यंत ही आकडेवारी ७०० मिलियनपेक्षा जास्त असेल. याची अनेक कारणे आहेत. मात्र, सर्वात मोठं कारण आहे जास्त वेळ मोठ्या आवाजात गाणी ऐकणं. आज वर्ल्ड हेअरिंग डे (World Hearing Day) म्हणजे ३ मार्चला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याबाबत रिपोर्ट सादर करणार आहे.

या रिपोर्टमध्ये सांगितलं जाणार आहे की, कशाप्रकारे तुम्ही ऐकण्याची शक्ती नेहमीसाठी वाचवून ठेवू शकता. यावर्षी हेअरिंग डे च्या थीमचं नाव हे Hearing care for All-Screen. Rehabilitate. Communicate. हे पहिल्यांदाच होणार आहे की, ऐकण्याच्या शक्तीबाबत  जगात पहिल्यांदा कुणी रिपोर्ट लॉन्च करणार आहे. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अंदाज आहे की आज जगात जी ऐकण्याच्या शक्तीची जी समस्या निर्माण होत आहे. त्याचं कारण  जास्त वेळ मोठ्या आवाजात म्युझिक ऐकणं हे आहे. आज जगभरात ६० टक्के तरूण या समस्येने प्रभावित आहेत.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, बहिरेपणाची समस्या जास्तीत जास्त त्या देशांमध्ये वाढत आहे जे पूर्णपणे विकसित झालेले नाहीत. तसेच या देशांनी या समस्येला दूर करण्याचे काही उपायही शोधले नाहीत ना याबाबत ते जागरूक आहेत. तसेच या देशांमध्ये एका चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरचीही कमतरता आह. अशात जेव्हा व्यक्ती ऐकण्याची शक्ती गमावून बसतो तेव्हा त्याला भाषा शिकण्यात अडचण येते आणि त्याला संवाद करणंही लिमिटेड होऊन जातं.

कठोर पावलं उचलणं गरजेचं

जगात लोकांच्या बहिरेपणाची स्थिती बघता WHO ने मानले आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची ऐकण्याची शक्ती गमावणं हे स्वीकार करण्यासारखं नाही. ही समस्या दूर करण्यासाठी काही पावलं उचलणं गरजेचं आहे. आता या समस्येसोबत दोन हात करण्यासाठी WHO सरकारांना यासंबंधी काही योजना लागू करण्याचा सल्ला देत आहे. 

कसा कराल बचाव?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले की, बहिरेपणा आणि कानाशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे तुम्ही मोठ्या आवाजात म्युझिक ऐकणं बंद करा. त्यासोबतच तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला कमी ऐकू येत आहे तर लगेच चेकअप करा. सोबतच यूएन हेल्थ एजन्सीचं सांगणं आहे की, कानाशी संबंधित समस्या किंवा ऐकण्याशी संबंधित समस्या होत असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

या कारणांनी होऊ शकता बहिरे

- तुम्हाला वाटत असेल की, बहिरेपणाची समस्या केवळ लाउड म्युझिकमुळे होत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. ही समस्या बऱ्याच लोकांना जन्मताच असते. त्यासोबतच इन्फेक्शन आणि खराब लाइफस्टाईलही बहिरेपणाचं कारण ठरू शकते.

- कानात इन्फेक्शन झाल्यानेही अनेकदा तुम्हाला कमी ऐकू येतं. ही एक स्वाभाविक बाब आहे. पण इन्फेक्शन पुन्हा पुन्हा होत असेल, किंवा कानातून द्रव्य येत असेल तर यानेही तुम्ही बहिरे होऊ शकता.
 

Web Title: World Hearing Day: Nearly 700 million people will experience hearing loss by 2050 warns who

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.