शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

World Health Day 2023: उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 11:02 IST

Foods To Avoid in Summer Season : या दिवसांमध्ये लोकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच ऊसाचा रस, नारळाचं पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो. अशात या दिवसांमध्ये कोणते पदार्थ आरोग्याला नुकसानकारक ठरतात हे जाणून घेऊ.

Foods To Avoid in Summer Season : उन्हाळ्यात खाण्या-पिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. तुम्ही या दिवसात योग्य आहार घेतला नाही तर तुम्ही आजारी पडू शकता. चुकीचा आहार घेतल्याने पोट खराब होतं. फूड पॉयजनिंग, पोटदुखी, उलटी इत्यादी समस्या होऊ शकतात. या दिवसांमध्ये निरोगी राहण्यासाठी थंड पदार्थ-पेयांचं सेवन अधिक केलं पाहिजे. जेणेकरून शरीर आतून थंड रहावं. या दिवसांमध्ये लोकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच ऊसाचा रस, नारळाचं पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो. अशात या दिवसांमध्ये कोणते पदार्थ आरोग्याला नुकसानकारक ठरतात हे जाणून घेऊ.

मसालेदार-तिखट पदार्थ - उन्हाळ्याच्या दिवसात जेवणात तिखट आणि मसाले कमी टाकले पाहिजे. तसेच जास्त तेलाचाही वापर करू नये. तसेच काही कोरड्या मसाल्यांचा वापर टाळावा. दालचीनी, गरम मसाला जास्त वापरू नये. याने शरीराचं तापमान वाढतं आणि पचनालाही समस्या होते. काही मसाल्यांमध्ये कॅपसेसिन नावाचं तत्व असतं. ज्याने शरीरात पित्त दोष वाढतो आणि याने शरीराची उष्णता वाढते. याने तुम्हाला घाम येणे, त्वचेवर पुरळ येणे, कमजोरी, डिहायड्रेशन इत्यादी समस्या होतात.

नॉनव्हेज खाणं कमी करा - जे लोक नेहमीच अधिक नॉनव्हेज खातात त्यांनी या दिवसात ते खाणं कमी केलं पाहिजे. तंदुरी चिकन, मासे, सीफूड अधिक खाणं टाळलं पाहिजे. कारण या दिवसात याने तुम्हाला अधिक घाम येऊ शकतो. सोबतच पचनासंबंधी समस्याही होतात. अनेकदा मांस-मच्छीचं अधिक सेवन केलं तर जुलाबही लागू शकतात.

जंक फूड टाळा - आजकालची तरूणाई आणि लहान मुलं पिझ्झा, बर्गर, चायनीज, मोमोज, समोसा, फ्रेंच फ्राइज इत्यादी पदार्थ अधिक खातात. पण उन्हाळ्यात हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तेलकट किंवा जंक फूड किंवा फास्ट फूड खाल्ल्याने पोट बिघडू शकतं. तसेच तेल-मसाल्यामुळे उन्हाळ्यात शरीराचं देखील तापमान अधिक वाढतं. 

लोणचं कमी खा - बऱ्याच लोकांना लोणचं खाणं आवडतं. जेवणासोबत जास्तीत जास्त लोक लोणचे खातात. याने टेस्ट चांगली होते. पण टेस्टच्या नादात तुमचं आरोग्य बिघडू शकतं. लोणच्यामध्ये तेल-मसाले अधिक असतात आणि ते फर्मेंटेड असतं. यात सोडियमचं ही प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे वॉटर रिटेंशन, सूज, अपचन, ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य