World cycle day: सायकल चालवणे करेल तुमच्या आरोग्याचा संपूर्ण कायापालट; स्वस्तात मस्त व्यायाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:06 IST2021-06-03T16:06:11+5:302021-06-03T16:06:50+5:30
३ जून रोजी जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो. याचे महत्व काय? हा दिवस का साजरा केला जातो हे आज आपण जाणून घेणार आहोत...

World cycle day: सायकल चालवणे करेल तुमच्या आरोग्याचा संपूर्ण कायापालट; स्वस्तात मस्त व्यायाम
आज जागतिक सायकल दिवस. सायकल चालवण्याचे अनन्यसाधारण फायदे आहेत. वजन घटवण्यापासून के गंभीर आजारांचा सामना करेपर्यंत सायकल चालवणे फायदेशीरच ठरते. ३ जून रोजी जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो. याचे महत्व काय? हा दिवस का साजरा केला जातो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
का साजरा केला जातो सायकल दिवस?
सायकलचे मानवी शरीराला जे काही फायदे होतात याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने ३ जून हा दिवस सायकल डे म्हणून साजरा करण्याचे नक्की केले. तेव्हापासून सायकल डे साजरा केला जातोय. सायकल चालवणे हे जसे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर आहे तसेच ते किफायतशीरही आहे. जाणून घेऊया काय आहेत सायकल चालवण्याचे फायदे...
सायकल चालवण्याचे फायदे
सायकल चालवल्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल होतो. आपले वजन नियंत्रित राहते. सायकल चालवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपले मसल्स अॅक्टीव्ह राहतात. त्यामुळे आपण फीट आणि फाईन राहतो. सायकल चालवल्यामुळे आपला स्टॅमिनाही वाढतो. सायकलमुळे कार्डिओव्हेस्क्युलर क्षमताही वाढते. हाडं मजबूत राहतात. डायबेटीज पासूनही बचाव होतो.