शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

World Cancer Day : तुमच्या बोटांवर आहे का अशी खूण?; मग कॅन्सर होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 15:48 IST

स्किन कॅन्सर (Skin cancer)ला मेलानोमा (melanoma) कॅन्सर असंही म्हटलं जातं. जर तुमच्या त्वचेवर एखादी खूण किंवा तीळ असेल आणि ती हळूहळू मोठी होऊ लागली तर, हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते.

स्किन कॅन्सर (Skin cancer)ला मेलानोमा (melanoma) कॅन्सर असंही म्हटलं जातं. जर तुमच्या त्वचेवर एखादी खूण किंवा तीळ असेल आणि ती हळूहळू मोठी होऊ लागली तर, हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या नखांवरूनही तुम्हाला स्किन कॅन्सर आहे की, नाही हे जाणून घेणं शक्य होतं. अनेक लोकांना या लक्षणांबाबत माहीत नाही. जाणून घेऊया नक्की काय आहेत ही लक्षणं...

आज जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) आहे. प्रत्येक वर्षाच्या 4 फेब्रुवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य हेतू म्हणजे, कॅन्सरबाबत जागरूकता पसरवणं हाच असतो. जगभरात लोकांच्या मृत्यूचं प्रमुख कारण कॅन्सर ठरत आहे. याचाच अर्थ असा आहे की, प्रत्येक 6 मृत्यूंपैकी एका व्यक्तीचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होतो. 

'वर्ल्ड कॅन्सर डे'ची थीम  (World Cancer Day theme)

2019मध्ये 'वर्ल्ड कॅन्सर डे'साठी 'मी आणि मी करू शकतो' (I Am and I Will) ही आहे. याचा अर्थ असा की, कोणत्याही व्यक्तीने ठरवलं तर कॅन्सरसारख्या रोगांशी लढून तो मूळापासून नष्ट करण्यासाठी मदत मिळते. जाणून घेऊया नखांवरून कॅन्सरच्या लक्षणांबाबत कसं जाणून घ्यावं त्याबाबत... 

ब्यूटी टेक्नीशियन मॅनीकुरिस्ट जीन स्किनरने सर्वात आधी नखांच्या कलरवरून स्किन कॅन्सरच्या या विचित्र लक्षणाचा अनुभव घेतला आहे. 2017मध्ये त्याच्या नखांवर एक सरळ रेष तयार झाली होती. सुरुवातीला नखांवर आलेल्या या रेषेचं कारण कॅल्शिअमची कमतरता, ब्लड ब्लिस्टर किंवा काही जेनेटिक मार्क असावं, असं अंदाज वर्तवण्यात आला. परंतु त्यांना मेलेनोमाच्या लक्षणांबाबत माहीत होतं म्हणून त्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्षं न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य समजलं. 

सबंगुअल मेलानोमा (Subungual melanoma) ची लक्षणं :

अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी (एएडी) यांच्यानुसार, सबंगुअल मेलानोमा (Subungual melanoma) ला नेल मेलोनोमाच्या नावाने ओळखलं जातं. हा एक स्किन कॅन्सर असून जो नखांच्या आतमध्ये होतो. हा 0.7 ते 3.5 टक्के लोकांना होतो. या आजाराची लक्षणं ओळखणं फार कठिण आहे. परंतु हात किंवा पायांच्या नखांच्या खाली काळ्या किंवा पिवळसर रेष तयार झाली तर ही स्किन कॅन्सरची लक्षणं असू शकतात. 

या गोष्टी लक्षात ठेवा

नखांच्या खाली काळ्या रंगाची रेष पडणं फक्त हेच स्किन कॅन्सरचं लक्षण नाही. तर नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडणं, रक्त येणं, सतत नखं तुटणं इत्याही लक्षणंही आहेत. 

सबंगुअल मेलानोमा (Subungual melanoma) वर उपचार

स्किन कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी प्राथमिक निदान महत्तवाचं ठरतं. त्यामुळे याप्रकारची कोणतीही लक्षणं दिसल्यावर डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्या. खासकरून तुमच्या नखांच्या आजूबाजूला एखादी काळी रेष तयार होत असेल तर अजिबात दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेच आहे. 

टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी