शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

World Breastfeeding Week : स्तनपान बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही ठरतं फायदेशीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 12:34 PM

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं. 

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं. 

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. 

आई झाल्यावर त्या महिलेच्या जबाबदाऱ्याही वाढतात. त्या बाळाला सांभाळणं न्हाऊ-माखू घालणं यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आईला कराव्या लागतात. पण यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला दूध पाजणं. हा अनुभव महिलेसाठी अत्यंत सुखद असतो, पण एखाद्या कोपऱ्यात किंवा बंद दाराआडच महिलेन बाळाला दूध पाजावं असं म्हटलं जातं. या सर्वांचा विरोध करून जर महिलेनं बाळाला सर्वांच्या डोळ्यादेखत, उघड्यावर दूध पाजलं तर ती महिला चर्चेचा विषय बनते. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का? स्तनपान करणं हे बाळासोबतच आईसाठीही फायदेशीर असतं. जाणून घेऊया स्तनपान करण्याचे बाळ आणि आईला होणारे फायदे...

स्तनपान केल्याने बाळाला होणारे आरोग्यदायी फायदे : 

- आईचं दूध बाळासाठी अमृतासमानच असतं. सहा महिने बाळाला इतर कशाचीही गरज नसते. जेवढं जास्त वेळ बाळाला आईचं दूध मिळतं तेवढाच वेगानं बाळाचा मानसिक आणि शारीरिक विकास होतो. 

- संशोधनानुसार, बाळाच्या विकासासाठी आणि पोषणासाठी ज्या तत्वांची आवश्यकता असते. ती सर्व तत्व आईच्या दूधामध्ये सामावलेली असतात. 

- आईच्या दूधामध्ये मुबलक प्रमाणात अ‍ॅन्टीबॉडिज असतात. त्यामुळे बाळाचा इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो. 

- स्तनपान करण्याचे भावनात्मकही फायदे असतात, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. कारण ज्यावेळी आई बाळाला दूध पाजते, त्यावेळी बाळ आईच्या सर्वात जवळ असतं. त्यामुळे ते भावनात्मक पद्धतीने एकमेकांशी जोडले गेलेले असतात. 

स्तनपान केल्याने आईला होणारे आरोग्यदायी फायदे :

- स्तनपानामुळे आईला ब्रेस्ट कॅन्सर आणि अन्य अनेक आजार होण्याचा धोका कमी होतो.

- स्तनपान केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी दूर होतात. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहते.

- स्तनपानामुळे शरीरातील ऑक्सीटोक्सिन हार्मोनचा स्त्राव वाढतो. त्यामुळे गरोदरपणानंतर गर्भाशय आणि शरीराला पुन्हा त्याच अवस्थेत आणण्यास मदत होते.  

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

 

टॅग्स :World Breastfeeding Weekजागतिक स्तनपान सप्ताहWomenमहिलाHealth Tipsहेल्थ टिप्स