पोटावरील चरबी कमी करायचीये? महिलांनी करा 'या' तीन सोप्या एक्सरसाइज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 10:46 AM2019-09-28T10:46:36+5:302019-09-28T10:59:38+5:30

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आणि सपाट पोट मिळवण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. जर पोटावरील चरबी वाढली तर ती कमी करणे इतकं सोपं नसतं.

Women should do these 3 things for reducing belly fat | पोटावरील चरबी कमी करायचीये? महिलांनी करा 'या' तीन सोप्या एक्सरसाइज!

पोटावरील चरबी कमी करायचीये? महिलांनी करा 'या' तीन सोप्या एक्सरसाइज!

Next

(Image Credit : www.msn.com)

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आणि सपाट पोट मिळवण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. जर पोटावरील चरबी वाढली तर ती कमी करणे इतकं सोपं नसतं. योग्य आहार आणि नियमित एक्सरसाइजच्या माध्यमातूनच पोटावरील चरबी कमी होऊ शकते. आज आम्ही महिलांसाठी तीन अशा एक्सरसाइज सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने त्या पोटावरील चरबी कमी करू शकतात.

(Image Credit : today.com)

जर एखाद्या महिलेला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर त्यांनी यासाठी मेहनत घेण्यास तयार रहावे. पोटावर अधिक चरबी जमा झाली तर हृदयरोग आणि इतरही आजारांचा धोका वाढू शकतो. डायबिटीसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मेहनत घेणं गरजेचं ठरतं. चला जाणून घेऊ तीन एक्सरसाइज....

सोप्या एक्सरसाइज ज्याने पोटावरील चरबी होईल कमी

सामान्यपणे वजन वाढायला वेळ लागत नाही. पण वजन कमी करायचं म्हटलं की, खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. यात घाई करून काही होत नाही. त्यामुळे काही एक्सरसाइज नियमित आणि गंभीरतेने केल्या तरच तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकाल. 

दोरीच्या उड्या आणि पुश अप्स

(Image Credit : bodybuilding.com)

या दोन्ही एक्सरसाइज करण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. दोन्ही एक्सरसाइज तुम्ही घरीच करू शकता. पाच मिनिटे दोरीवरून उड्या मारा आणि त्यानंतर ५ मिनिटे पुश अप्स करा. असं तुम्ही आणखी काही वेळा करू शकता. मात्र, सुरूवातीला फार जास्त वेळ करू नका. एक्सरसाइजचा वेळ हळूहळू वाढवा.

बसण्याचा आणि चालण्याचा पॉश्चर

(Image Credit : medicalnewstoday.com)

एक्सरसाइज करण्यासोबतच तुम्ही बसण्याच्या आणि चालण्याच्या पॉश्चरवरही लक्ष द्यावे. जर तुम्ही योग्य पद्धतीने बसले नसाल तर तुमचं पोट बाहेर येईल. जेव्हाही बसाल तेव्हा पाठ ताठ ठेवा आणि जेव्हा चालता तेव्हा सरळ आणि वेगाने चला. वाकून किंवा सुस्त होऊन चालू नका. याने पोटावरील चरबी नियंत्रित ठेवण्यास आणि कमी करण्यासही फायदा होईल. पण हे नियमित करावं लागेल.

सायकल चालवा किंवा स्मीमिंग करा

(Image Credit : blog.mapmyrun.com)

या दोनपैकी एक एक्सरसाइज तुमच्या लाइफस्टाईलमध्ये सामिल करा. सायकल चालवून तुम्ही कॅलरी बर्न करू शकता. यानेच तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. रोज कमीत कमी ४० मिनिटे सायकल चालवा. जर सायकल चालवू शकत नसाल तर स्वीमिंगचा पर्याय निवडा. रोज ४० मिनिटे स्वीमिंग करून तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

(टिप : या एक्सरसाइज घरी करायच्या असल्या आणि सोप्या असल्या तरी सुरूवात करण्याआधी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आवर्जून घ्यावं. जेणेकरून काही समस्या होऊ नये.)

Web Title: Women should do these 3 things for reducing belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.