बापरे! मासिक पाळीदरम्यान तरूणीच्या डोळ्यातून आले रक्ताचे अश्रू; समोर आला 'हा' दुर्मिळ आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 13:09 IST2021-03-23T12:56:52+5:302021-03-23T13:09:46+5:30
Woman got blood eyes she is on period: या महिलेला तीन महिने ओरल कॉन्ट्रासेप्टीव देण्यात आलं होतं. त्यानंतर या महिलेच्या डोळ्यातून रक्त येणं बंद झालं.

बापरे! मासिक पाळीदरम्यान तरूणीच्या डोळ्यातून आले रक्ताचे अश्रू; समोर आला 'हा' दुर्मिळ आजार
साधारणपणे मासिक पाळी ५ ते ६ दिवस असते. त्यावेळी पोटात दुखणं, पाठ दुखणं, चिडचिडपणा, थकवा, सुज येणं, जेवण्याची इच्छा नसणं अशा समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त अशी काही लक्षणं आहेत. ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. चंदीगढमधील एका २५ वर्षांच्या महिलेला काही दिवसांपूर्वी रक्ताचे अश्रू आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेच्या डोळ्यातून रक्त बाहेर येत होतं. काही महिन्यांपासून ही समस्या जाणवू लागली होती.डॉक्टरांनी रेडओलॉजिकल आणि ऑप्थेमोलॉजिकल तपासणीनंतर डोळ्यांतून रक्त नेमकं का बाहेर येतंय याचा शोध लावला. समोर आलेल्या माहितीनुसार सुरूवातीपासूनच ही महिला एका दुर्मिळ आजाराचा सामना करत होती. या आजाराला ocular vicarious menstruation असं म्हणतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मासिक पाळी येते त्याचवेळी या महिलेच्या डोळ्यातून रक्त बाहेर येतं. ही महिला या दुर्मिळ आजाराचा सामना करत असून किडनी, नाक, डोळे आणि ओठांमधून रक्त बाहेर येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक केस स्टडी प्रकाशित करण्यात आली होती. यानुसार या महिलेला तीन महिने ओरल कॉन्ट्रासेप्टीव्ह देण्यात आलं होतं. त्यानंतर या महिलेच्या डोळ्यातून रक्त येणं बंद झालं. या दुर्मिळ आजारासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह एक प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. Covid-19 oral vaccine : भारतीय कंपनीनं बनवली कोरोनाची 'कॅप्सूल वॅक्सिन'; संसर्गापासून तिप्पट बचाव करणार, तज्ज्ञांचा दावा
डोळ्यातून रक्त बाहेर येण्याच्या स्थितीला हेमोक्लेरिया असं म्हणतात. डोळ्यांना जखम झाल्यानंतरही या समस्येचा सामना करावा लागतो. पण या महिलेला जाणवणारी समस्या ही खूपच गंभीर होती. याआधीही २०१६ मध्ये ब्रिटिश टीनेजर मार्नी रे या महिलेला या समस्येचा सामना करावा लागला होता. रे च्या कान, नाक तोंड आणि नखांमधून रक्त बाहेर येत होतं. जेव्हाही या महिलेला मासिक पाळी यायची तेव्हा या महिलेला खूप त्रास व्हायचा. २०१४ मध्ये ३१ वर्षांच्या एका महिलेला असा आाजार झाला होता. सावधान! जास्तवेळ बसून काम केल्यानं कमी वयातच होऊ शकतो कमरेचा आजार; या उपायांनी मिळवा आराम