उभं राहून पाणी प्यायल्यानं काय होतं? वाचाल तर अनेक आजारांचा टाळू शकाल धोका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:03 IST2024-12-24T16:03:13+5:302024-12-24T16:03:49+5:30
Drink Water While Standing : चिंताजनक बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नसतं की, उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान काय आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उभं राहून पाणी प्यायल्यानं काय होतं? वाचाल तर अनेक आजारांचा टाळू शकाल धोका!
Drink Water While Standing: शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराला पोषण मिळण्यासाठी पाणी पिणं फार गरजेचं आहे. अनेकदा तुम्ही घरातील वृद्ध लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की, खाली बसून पाणी प्या. कारण उभं राहून पाणी प्यायल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. पण तरीही अनेकजण दुर्लक्ष करत उभं राहून पाणी पितात. त्याहून चिंताजनक बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नसतं की, उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान काय आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही पुन्हा अशी चूक करणार नाही.
अनेकदा घरातील मोठे लोक सांगतात की, उभं राहून पाणी पिऊ नये. पाणी नेहमी खाली बसूनची प्यावेय. कारण उभं राहून पाणी प्याल तर शरीरात अनेक गंभीर समस्या होतात. संधिवात, किडनीसंबंधी आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होतात.
संधिवाताचा धोका
जेव्हा तुम्हा उभं राहून घाईघाईने पाणी पिता तेव्हा नसांवर दबाव पडतो. ज्यामुळे शरीरात तरल पदार्थाचं संतुलन बिघडतं आणि टॉक्सिनचं प्रमाण वाढतं. या प्रक्रियेत जॉइंट्समध्ये तरल पदार्थ जमा होण्याचा धोका असतो. ज्यामुळे संधिवात होऊ शकतो आणि हाडांसंबंधी समस्याही होऊ शकतात.
फुप्फुसांवर प्रभाव
उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील आवश्यक पोषक तत्व, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स लिव्हर व पचन तंत्रापर्यंत योग्यपणे पोहोचत नाही. पाणी वेगाने पोटातून निघून जातं. ज्यामुळे फुप्फुसं आणि हृदयाच्या क्रियांवर वाईट प्रभाव पडतो. कारण असं केल्याने ऑक्सीजनचं प्रमाण प्रभावित होतं.
पचनासंबंधी समस्या
उभं राहून पाणी प्यायल्याने पचन तंत्रावरही नकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा पाणी वेगाने अन्ननलिकेतून पोटात पोहोचतं तेव्हा ते नुकसानकारक ठरतं. ढसाढसा पाणी प्यायल्यानं नसांवर दबाव पडतो, ज्यामुळे तरल पदार्थांचं संतुलन बिघडतं. अशात टॉक्सिन आणि पोटासंबंधी समस्या वाढतात.
किडनीवर प्रभाव
आपण जेव्हा बसलेले असतो तेव्हा किडनी योग्य पद्धतीने काम करते. जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा ते थेट पोटाच्या खालच्या भागात फिल्टर न होता पोहोचतं. ज्यामुळे किडनीचं काम प्रभावित होतं आणि यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका वाढतो.
कसं प्यावं पाणी?
जेवण करताना किंवा जेवण केल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जेव्हा एक्सरसाईज करता तेव्हा जास्त पाणी पिऊ नये. जेव्हाही तहान लागेल तेव्हा एकदम भरपूर पाणी पिऊ नका. पाणी हळूहळू एक एक घोट घेत प्यावं. झोपून पाणी अजिबात पिऊ नये. निरोगी राहण्यासाठी एका वयस्क व्यक्तीने दिवसातून २.५ ते ३ लीटर पाणी प्यावं.
पाणी पिण्याची योग्य पद्धत
एक्सपर्टनुसार, खाली बसून पाणी पिणं ही सगळ्यात योग्य पद्धत आहे. खुर्चीवर बसून पाठ सरळ करून पाणी प्यायल्यानं पोषक तत्व मेंदुपर्यंत पोहोचतात आणि मेंदुचं काम आणखी चांगल्या पद्धतीनं होतं. त्याशिवाय पचन तंत्रही अधिक चांगल्या पद्धतीने काम करतं आणि पोटात सूज किंवा गॅसची समस्या होत नाही.