शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नातून अचानक जाग का येते? हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 06:02 IST

Science News: एकूण दोन प्रकारच्या ‘निद्रा’ असतात, हे आपण पाहिले. रेम (REM) आणि नॉन रेम. या दोन्ही रात्रभरात दर दीड तासाने आलटून-पालटून येतात. रेम (REM) ही झोप पहाटे ३ नंतर सर्वाधिक असते. नॉन रेम आणि रेम या झोपेच्या  दोन्ही अवस्था पतंजलीने २३०० वर्षांपूर्वी नोंदविल्या आहेत.

- डॉ. अभिजित देशपांडे(इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस iissreports@gmail.com)

एकूण दोन प्रकारच्या ‘निद्रा’ असतात, हे आपण पाहिले. रेम (REM) आणि नॉन रेम. या दोन्ही रात्रभरात दर दीड तासाने आलटून-पालटून येतात. रेम (REM) ही झोप पहाटे ३ नंतर सर्वाधिक असते. नॉन रेम आणि रेम या झोपेच्या  दोन्ही अवस्था पतंजलीने २३०० वर्षांपूर्वी नोंदविल्या आहेत. त्याला ‘सुषुप्ती’ आणि ‘स्वप्न’ असे म्हणतात. पहाटे ‘ब्राम्ह मुहूर्त’ असे सांगून मेंदूच्या अति ऊर्जितावस्थेचा फायदा घेण्याचे पतंजली सुचवतो!

जागृत अवस्था आणि रेम यामध्ये एक साधर्म्य असे की दोघांचा ई. ई. जी (मेंदूतील लहरींचे विद्युत आलेखन) हा सारखाच दिसतो. पण जागेपणी डोपामीन, सेरेटोनीन, नॉरॲड्रनलीन ही न्युरोट्रान्समीटर्स सर्वाधिक प्रमाणात वापरली जातात. तर रेम झोपेत ही सगळ्यात कमी वापरली जातात. याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.मेंदूचे चार ठळक भाग आहेत. १) मोठा मेंदू (फोर ब्रेन) २) लहान मेंदू (सेलेबलम)  ३) देठ (ब्रेनस्टेम)  ४) मेडुला मोठ्या मेंदूमध्ये विचार येणे, भावना निर्माण होणे, गोष्टींचे आकलन, स्मरण आदी क्रिया होतात.

मोठा मेंदू आणि देठ यांना जोडणारे द्वार म्हणजे ‘थॅलमॅस’ हा भाग होय. मेंदूकडे जाणाऱ्या सर्व संवेदना (गंध सोडून) या भागातूनच जातात. झोपेच्या सुरुवातीला हे दार बंद होते, म्हणूनच आपल्याला झोपेत स्पर्श, तापमान इत्यादी संवेदना होत नाहीत. रेम झोपेमध्ये या दारातून काही संवेदना स्वत:हून  शरिरातून प्रवेश मिळवतात. मोठ्या मेंदूचेदेखील भावनांशी संबंधित असलेले हिपोकॅम्पस, ॲमिग्डीला असे भाग आहेत. रेम झोपेत हे भाग उद्दिपीत होतात. दु:खद, धक्कादायक घटना भावनिक मेंदूमध्ये, विशिष्ट कप्प्यात (एखादा काटा खुपावा तशा) साठलेल्या असतात. अशी घटना दिवसा घडली की पुढच्या काही रात्रींमध्ये रेम झोप हा काटा काढण्याचा स्वप्नरुपाने प्रयत्न करते.  काहीवेळेला स्वप्नातून जाग येते आणि झोप लागत नाही. अशावेळेला ‘इ. एम. डी. आर.’ ही डोळ्यांच्या हालचालीचा वापर करण्याची पद्धत उपयोगी पडते. अर्थात स्वप्नांतून जाग येण्याचे कारण केवळ भावनिकच असेल, असे नाही. दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारणाचा उल्लेख करणे भाग आहे. ‘ऑबस्ट्रीक्टीव स्लीप ॲप्नीआ’ ही झोपेमध्येच होणारी व्याधी आहे. त्याबद्दल पुढल्या आठवड्यात!

टॅग्स :Healthआरोग्यscienceविज्ञान