तुम्हालाही नखं खाण्याची सवय आहे का? 'या' मानसिक आजारामुळे लागू शकते सवय....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 03:18 PM2021-02-27T15:18:37+5:302021-02-27T15:21:33+5:30

Health Care : नखं खाण्याची सवय अस्थायी असते आणि याने सामान्यपणे काही नुकसानही होत नाही. पण काही बाबतीच नखं खाणं एका गंभीर मानसिक आजाराचा (Mental Disorder)  संकेत असू शकतो.

Why do people bite their nails these mental conditions could be the reason | तुम्हालाही नखं खाण्याची सवय आहे का? 'या' मानसिक आजारामुळे लागू शकते सवय....

तुम्हालाही नखं खाण्याची सवय आहे का? 'या' मानसिक आजारामुळे लागू शकते सवय....

googlenewsNext

जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना आणि तरूणांना नखं खाण्याची (Nail Biting) सवय असते. त्यासोबतच तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल की, ते नर्वस असतात किंवा त्यांना कशाप्रकारचं टेंशन असतं तेव्हा ते नखं कुरतडू लागतात. तुम्हीही हे काम कधीना कधी केलं असेल. तशी तर नखं खाण्याची सवय अस्थायी असते आणि याने सामान्यपणे काही नुकसानही होत नाही. पण काही बाबतीच नखं खाणं एका गंभीर मानसिक आजाराचा (Mental Disorder)  संकेत असू शकतो.

'या' कारणाने नखं खातात जास्तीत जास्त लोक

अमेरिकेच्या Psychology Today नुसार, नखं खाण्याच्या सवयीला मेडिकल टर्ममध्ये ऑनिफोजेफिया (Onychophagia) म्हटलं जातं. ही एक पॅथॉलॉजिकल मौखिक सवय आहे ज्यामुळे बोटांची नखे आणि नखांच्या आजूबाजच्या टीशूजला नुकसान पोहोचतं. तशी तर नखं खाण्याचं निश्चित असं कारण नाहीये. पण ही सवय सामान्यपणे बालपणी लागते. एखाद्या व्यक्तीला ही सवय का आणि कशी लागते याचं काही स्पष्ट कारण नाही. पण एकदा ही सवय लागली तर थांबवणं फार अवघड असतं. काही केसेसमध्ये नखं खाण्याची सवय एखाद्या मानसिक आजाराचा संकेतही असू शकतो. (हे पण वाचा : सावधान! लवकर झोपल्याने असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा....)

१)  ज्या लोकांना नखं खाण्याची सवय असते. ते लोक असं सामान्यपणे तेव्हा करतात जेव्हा त्यांना कशामुळे तरी चिंता किंवा अस्वस्थता जाणवते. याचं कारण हे आहे की नखं खाल्ल्याने तणाव, टेंशन आणि कंटाळा दूर करण्यास मदत मिळते.

२) यासोबतच अनेक लोक ते नर्वस असले की, एकटेपणा जाणवत असेल तेव्हा आणि नंतर भूक लागल्यावरही नखं खातात. (हे पण वाचा : रात्री-अपरात्री अचानक जाग येते का?; पुन्हा शांत झोप लागण्यासाठी ८ उपयुक्त टिप्स)

३) बालपणी काही मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. जी अनेकदा मोठे झाल्यावर नखं खाण्याची सवयीत बदलते.

४) यासोबतच काही मानसिक आजारामुळेही नखं खाण्याची सवय लागत असते. अटेंशन डेफिसिट हाइपरऐक्टिविटी डिसऑर्डर (ADHD), मेजर डिप्रेसिव डिसऑर्डर (MDD), ऑब्सेसिव कम्पलसिव डिसऑर्डर (OCD), कुणी आलं सोडून गेल्याची चिंता (सेपरेशन एंग्जाइटी) यांचा त्यात समावेश होतो.

५) काही लोकांमध्ये नखं खाण्याची सवय ही जेनेटिक असते. म्हणजे ज्या मुलांच्या आई-वडिलांना ही सवय असते ती मुलांमद्येही येते.

नखं खाण्याचे नुकसान

- नखं आणि त्याच्या आजूबाजूच्या स्कीनवर सूज येणे, जखम होणे

- नखं असामान्य दिसणे

- नखं आणि आजूबाजूच्या स्कीनमद्ये फंगल इन्फेक्शन होणं

- नखांमध्ये असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस पोटात गेल्याने आजारी पडणे

- नखं खाल्ल्याने दातांचंही नुकसान होतं
 

Web Title: Why do people bite their nails these mental conditions could be the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.