शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मुलं आत्महत्या का करतात; जाणून घ्या, ताण आलाय हे कसे ओळखावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 08:16 IST

मुद्द्याची गोष्ट : लहान मुलांकडून अचानक घडणाऱ्या आत्महत्या नेहमीच मन विषण्ण करतात. वरकरणी साधी वाटणारी कारणे आत्महत्येला प्रवृत्त करतात तेव्हा जगण्यातील आशा, दिशा व हेतूच संपले असावेत की, जीवनाला घट्ट पकडून ठेवण्याइतके ताकदीचे ते कधी नव्हतेच याचा शोध घ्यावा लागतो. प्रेम, जिव्हाळा या मुलांच्या नात्यांमध्ये रुजला नाही का? जगण्याला होकार देणारा आशावाद या मनांमध्ये वाढलाच नाही का? 

डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकास तज्ज्ञ, पनवेल

विस्तवासारख्या होत चाललेल्या वास्तवात, कल्पनाविश्वात अस्वस्थ येरझारांनी असह्य थकवा आलेल्या मुलांसमोर आत्महत्या हा एकमेव पर्याय म्हणून उभा राहतो आहे, ही बाब गंभीर आहे. दहशतवादी, अतिरेकी, युद्धपिपासू सत्ताधारी, जीवघेणी अणुबॉम्बसारखी,जंतू संसर्ग व रासायनिक परिणाम घडवणारी शस्त्रे, व्यसने, रोगराई या साऱ्यापेक्षा जास्त मनुष्यबळी गेल्या कित्येक शतकात आत्महत्यांनी घेतले आहेत. किशोरावस्थेतील चार पैकी एक मूल निराशाग्रस्त असू शकते, हा मानसशास्त्राचा इशारा आपण लक्षात घेऊ. घडून गेलेल्या एका आत्महत्येवेळी, जवळजवळ २७ आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न सामोरे आलेले नसतात, असेही एक रिपोर्ट सांगतो. एका आत्महत्येने सोबतीच्या किमान ५ माणसांचा मनस्ताप वाढतो,असे सांगितले जाते. 

आजवरच्या अभ्यासात आत्महत्येस कारणीभूत ठरणारी अनेक कारणे सामोरी आली आहेत. जीवनातील घटनांची वाढत चाललेली अफाट गती,असह्य ताणतणाव, व्यवहार वादात सुकत चाललेली नातीगोती, ताब्यात न राहिलेले आवेग, आसपासचे निष्ठूर जग, स्वार्थी बाजार वादात हतबल, हरवत चाललेला विवेक... निराशेत दिलासा देणारी अमूल्य नीती तत्वे कमकुवत होत चालली आहेत. आता वेळ आलेली आहे तातडीने आपले आपल्या आणि इतरही मुलांशी असलेले नाते बारकाईने अभ्यासून ते दृढ करण्याची, मनोरंजनासोबत मनोविकास साधणारा निखळ, नि:स्पृह स्नेहसेतू बांधण्याची !  

अचानक येणाऱ्या स्वनाशाच्या आवेगापोटी घडणारी आत्महत्या ही नीट ठरवून केल्या जाणाऱ्या आत्महत्येपेक्षा थोडी वेगळी,कधी कमी तीव्र असू शकते. त्यात मरण्याच्या इच्छेपेक्षा तीव्र वैताग,हतबलता जास्त असते. नीट ठरवून केल्या जाणाऱ्या आत्महत्येमध्ये डिप्रेशन सारख्या आजारांची भूमिका महत्त्वाची ठरते. तेथे अगोदर मदत अप्रत्यक्षपणे मागितलीही असेल, पण ती कुणीच समजून घेतली नसल्याचा विषाद जास्त असेल. मनात वैफल्य दाटले असेल तर इतरांचा प्रतिसाद समजणेही कठीण जाते.  

परीक्षेच्या वेळी काय होतं? छातीत धडधड वाढते, पोटात गोळा येतो, तोंडाला कोरड पडते, डोळ्यासमोर अंधारी येते, हॉलमधून पळावेसे वाटते. आधी वाचलेले आठवेनासे होते. बऱ्याचदा पेपर मिळण्याआधीच अशी स्थिती सुरू होते. कारण पेपर कसा असेल हे अनिश्चित असतं, अनपेक्षित असतं. ह्याला आपण भीती किंवा टेन्शन म्हणतो. म्हणजेच थ्रिल किवा भीती, टेन्शन देऊ शकेल अशा कोणत्याही अपेक्षित,अनपेक्षित घटनेला शरीराची ही प्रतिक्रिया सारखीच असते. अनपेक्षित घटनेला सामोरे जायला शरीर सज्ज होते एवढाच त्याचा अर्थ घ्यावा हे उत्तम!!

ताण आलाय हे कसे ओळखावे?अभ्यासात लक्ष न लागणे, अभ्यास टाळणे, पोटात गोळा उठणे, परीक्षेत किवा वर्गात प्रश्न विचारल्यास डोळ्यापुढे अंधारी येणे, डोके दुखणे, खूप घाम येणे, धडधड होणे, घाबरेघुबरे होणे, घरात चिडचिड करणे, शाळा चुकवावी वाटणे, भूक न लागणे, सतत परीक्षेची,मार्कांची भीती वाटणे, ही ताणाची काही लक्षणे आहेत. 

ताण म्हणजे काय? सगळ्यांनाच काही प्रमाणात ताण येतो, तो आवश्यकच असतो, नाहीतर आपण कदाचित काहीच प्रयत्न करणार नाही. ताण म्हणजे अनपेक्षित गोष्टीला सामोरे जाण्याची शरीराची तयारी. ते जणू काही इंजिन स्टार्ट करतं.