'या' समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये भेंडीची भाजी, पडेल महागात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 14:00 IST2024-06-06T14:00:05+5:302024-06-06T14:00:37+5:30
भेंडीची भाजी सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. काही वेगळे आजार असलेल्या लोकांनी या भाजीचं सेवन करणं घातक ठरू शकतं.

'या' समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये भेंडीची भाजी, पडेल महागात...
भेंडीची भाजी मोठ्या आवडीने अनेक लोक खातात. लहान मुलांना सुद्धा ही भाजी खूप आवडते. कारण याची टेस्टही चांगली लागते आणि याचे शरीरालाही अनेक फायदे मिळतात. भेंडीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस असतात.
असं असलं तरी ही भाजी सगळ्यांसाठी फायदेशीर नाही. काही वेगळे आजार असलेल्या लोकांनी या भाजीचं सेवन करणं घातक ठरू शकतं. जर काही आजारांमध्ये या भाजीचं सेवन केलं तर तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. त्यामुळे कुणी भेंडीची भाजी खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
किडनी स्टोन
किडनी स्टोन झालेल्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यात भरपूर ऑक्सलेट असतं. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर भेंडीची भाजी खाऊ नये.
गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या
भेंडीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या करू शकतं जसे की, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि अपचन. त्यामुळे अशा समस्या असलेल्या लोकांनी भेंडीची भाजी अजिबात खाऊ नये.
एलर्जी
काही लोकांना भेंडीची एलर्जी असते. ज्या लोकांना त्वचेवर रॅशेज, खाज किवा काही रिअॅक्शन असेल तर त्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये.
हाय ब्लड प्रेशर
हाय ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांनी पोटॅशिअम असलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. भेंडीमध्ये भरपूर पोटॅशिअम असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर आणखी वाढू शकतं.