'या' लोकांसाठी सकाळी उपाशीपोटी सफरचंद खाणं नुकसानकारक, जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:40 IST2024-12-11T12:38:58+5:302024-12-11T12:40:03+5:30
Health Tips : काही लोकांसाठी हे फळ सकाळी उपाशीपोटी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात हे जाणून घेऊया की, कोणत्या लोकांनी सफरचंद रिकाम्या पोटी खाऊ नये.

'या' लोकांसाठी सकाळी उपाशीपोटी सफरचंद खाणं नुकसानकारक, जाणून घ्या कारण!
Health Tips : सफरचंद एक असं फळ आहे ज्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यामुळेच या फळांचं सेवन लोक नियमितपणे करतात. सकाळी उपाशीपोटी या फळाचं सेवन करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, काही लोकांसाठी हे फळ सकाळी उपाशीपोटी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात हे जाणून घेऊया की, कोणत्या लोकांनी सफरचंद उपाशीपोटी खाऊ नये.
उपाशीपोटी सफरचंद खाण्याचे नुकसान
अॅसिडिटी किंवा गॅस असलेल्यांनी
सफरचंदामध्ये फायबर आणि नॅचरल शुगर असते. जी काही लोकांमध्ये अॅसिडिटीची समस्या निर्माण करू शकते. जर पोटात आधीच जळजळ किंवा गॅसची समस्या असेल तर उपाशीपोटी सफरचंद खाणं नुकसानकारक ठरू शकतं.
कमजोर पचन तंत्र
ज्या लोकांचं पचन तंत्र कमजोर आहे त्यांनी उपाशीपोटी सफरचंदाचं सेवन करू नये. जर या लोकांनी उपाशीपोटी सफरचंद खाल्लं तर पोटदुखी किंवा पोटात जडपणा निर्माण होऊ शकतो.
डायबिटीसचे रूग्ण
सफरचंदामध्ये आढळणारं फ्रक्टोज आणि ग्लूकोजने उपाशीपोटी ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. डायबिटीसच्या रूग्णांनी हे फळ रिकाम्या पोटी खाणं टाळलं पाहिजे.
आयर्रिटेबल बाउल सिंड्रोम
सफरचंदामध्ये फोडमॅप्स नावाचं तत्व असतं. जे आयर्रिटेबल बाउल सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये पोट फुगणे, गॅस आणि इतर समस्या निर्माण करू शकतं.