कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी? आरोग्याचं होईल मोठं नुकसान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:22 IST2024-10-08T13:22:05+5:302024-10-08T13:22:55+5:30
lemon warm water : आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यावर लिंबू पाण्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी लिंबू पाण्याचं सेवन करू नये.

कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी? आरोग्याचं होईल मोठं नुकसान...
Honey, lemon warm water : आजकाल जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रोज लिंबू पाण्याचं सेवन करतात. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. सोबतच चेहरा चमकदार होतो आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. मात्र, आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यावर लिंबू पाण्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी लिंबू पाण्याचं सेवन करू नये.
लिंबू पाणी कुणासाठी घातक?
संधिवाताने पीडित लोकांनी लिंबू पाण्याचं अजिबात सेवन करू नये. त्याशिवाय ज्यांना हायपर अॅसिडिटी आणि पित्त दोष आहे अशा लोकांनी सुद्धा लिंबू, मध आणि गरम पाण्याचं सेवन करू नये.
तसेच ज्या लोकांची हाडे कमजोर होतात, दात कमजोर असतात त्यांनीही लिंबू पाण्याचं सेवन करू नये. त्याशिवाय तोंडात फोड आले असेल किंवा अल्सर असेल तर त्यांनीही लिंबू पाणी पिऊ नये.
गरम लिंबू पाणी कसं प्याल?
जर वरच्या समस्या असलेल्या लोकांना लिंबू पाणी प्यायचंच असेल तर त्यांनी ते हलकं गरम करून प्यावं आणि थोडंच प्यावं. लिंबू पाण्यात मध चांगलं मिक्स करावं. पाणी फार जास्त गरम करू नये. मध कधीच पाण्यात गरम करू नये.
एका दिवसात किती लिंबू पाणी प्यावं?
लिंबू पाणी पिऊन शरीराचं नुकसान होऊ नये आणि आरोग्य चांगलं रहावं यासाठी ते योग्य प्रमाणात पिणं गरजेचं असतं. एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात दोन लिंबाचा ज्यूस प्यायला जाऊ शकतो. २ लिंबाच्या रसात पाणी मिक्स करून सेवन करा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील आणि नुकसानही होणार नाही.
किडनी स्टोनची समस्या
लिंबामध्ये आम्ल असण्यासोबतच याची ऑक्सलेट लेव्हलही जास्त असते. ज्यामुळे हे शरीरात जाऊन क्रिस्टलही तयार करु शकतं. हे क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट तुमच्या किडनीमध्ये जाऊन स्टोन तयार करतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही लिंबाचं सेवन कराल तेव्हा त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या.