काय सांगता? 'या' लोकांनी अजिबात खाऊ नये अननस; बिघडू शकते तब्येत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:11 IST2024-08-05T16:00:23+5:302024-08-05T16:11:05+5:30
अननस खायला अनेकांना आवडतं. काहींना त्याचा ज्युस आवडतो. लहान मुलांना आवडणारी जेली आणि कँडी बनवायला देखील त्याचा वापर केला जातो.

काय सांगता? 'या' लोकांनी अजिबात खाऊ नये अननस; बिघडू शकते तब्येत
अननस खायला अनेकांना आवडतं. काहींना त्याचा ज्युस आवडतो. लहान मुलांना आवडणारी जेली आणि कँडी बनवायला देखील त्याचा वापर केला जातो. लग्नसमारंभ, पार्ट्यांमध्ये अनेकदा अननसाचं वेलकम ड्रिंक असतं. यात अनेक पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. डायटीशियन आयुषी यादव यांच्या मते, सर्व फायदे असूनही, प्रत्येकाने हे फळ खाऊ नये कारण काही मेडिकल कंडिशनमध्ये ते हानिकारक ठरू शकतं.
'या' लोकांनी खाऊ नये अननस
ऍलर्जी ग्रस्त लोक
विशेषत: ज्यांना या फळाची ऍलर्जी आहे त्यांनी अननस खाऊ नये. याशिवाय अननस जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. सर्दी आणि खोकल्यापासून आपलं संरक्षण करतं, परंतु व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यास डायरियाचा धोका होऊ शकतो.
मधुमेहाचे रुग्ण
अननसाचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे ते खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. मधुमेह असलेल्या रुग्णांना अनेक फळं खाण्याचा सल्ला दिला जात असला तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी अननसाचे सेवन अजिबात फायदेशीर नाही. हे एक गोड फळ आहे आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप जास्त आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते आणि रुग्णांचं आरोग्य बिघडू शकतं.
दातांच्या समस्यांनी त्रस्त
अननस हे एक गोड फळ आहे आणि त्याचं हाय एसिडिक नेचर मानलं जातं जे आपल्या दातांसाठी चांगलं नाही. ज्या लोकांचं ओरल हेल्थ चांगलं नाही त्यांनी हे फळ शक्य तितकं कमी खावं अन्यथा दात किडू शकतात. दात तुटणे आणि दात पडणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.