शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

काळजी वाढली! कोविड १९ च्या लक्षणांबाबत WHO नं दिली सूचना; जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 17:22 IST

कोरोना विषाणूंचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवं. 

जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातील देशांना कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आवाहन केलं आहे. कोरोना संक्रमणाची माहिती मिळण्यासाठी ज्या लोकांमध्ये  कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. अशा लोकांचीही चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. कोविड १९ च्या प्रसाराबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख मारिया वान केरखोवे (Head of Technology, Maria Van Kerkhove) यांनी एका संम्मेलनादरम्यान सांगितले की, कोरोना विषाणूंचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवं. 

ज्या  रुग्णांमध्ये  संक्रमणाची सौम्य लक्षणं  दिसत आहेत किंवा जराही लक्षणं  दिसत नसलेल्या रुग्णांचीही तपासणी करायला हवी. याआधीही अमेरिकेतील आरोग्य संस्थेनं आपल्या नियमांमध्ये बदल करत संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या ज्या लोकांमध्ये लक्षणं दिसत नाहीत अशा लोकांना चाचणी करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं होतं. 

अमेरिकेच्या नवीन गाईडलाईन्स कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी नाहीत

अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राकडून(Centers for Disease Control and Prevention) स्थानिक आरोग्य अधिकारी वर्गाला सांगण्यात आलं की, संक्रमत व्यक्तीच्या आजबाजूला 1.8 मीटर परिसरात 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जी व्यक्ती संपर्कात आली आहे त्यांची तपासणी करणं अनिवार्य आहे. आता नवीन गाईडलाईन्सनुसार  संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणं दिसत नसतील तर चाचणी करणं अनिवार्य नाही. परिणामी संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे.

लोकांकडून सोशल डिस्टेंसिंगचं पालन होत नाही

केरखोवे यांनी सांगितले की, कोरोनाची करणं चाचणी गरजेचं असून संक्रमित लोक आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना वेगळं ठेवून त्यांची तपासणी होणं तितकंच महत्वाचं आहे. संक्रमण रोखण्यासाठी तसंच व्हायरसची चेन तोडण्यास यामुळे मदत होईल. लोकांकडून सोशल डिस्टेंसिंगचं पालन अजूनही व्यवस्थित केलं जात नाही. मास्क लावल्यानंतरही दीड मीटरचं अंतर पाळायला हवं असंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ७५,७६० रुग्ण आढळून आले. जगभरातील कोणत्याही देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आजवर आढळले नव्हते. त्यामुळे तो विक्रमही आता भारताच्या नावावर जमा झाला आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण आता ७६.२४ टक्के झाले असून, त्यांची संख्या २५ लाखांवर पोहोचली आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३३,१०,३२४ झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आणखी १,०२३ जण मरण पावल्याने कोरोना बळींचा एकूण आकडा ६०,४७२ झाला आहे. या आजारातून २५,२३,७७१ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.सध्या देशात 7,25,991 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 21.93% इतकी आहे. दररोज होत असलेल्या कोरोना चाचण्यांचे वाढते प्रमाण, रुग्णांवर वेळीच होणारे उपचार यामुळे मृत्युदर 1.83% इतका कमी राखण्यात सरकारी यंत्रणांना यश आले आहे.

हे पण वाचा-

दिलासादायक! भारतात २०२१ च्या सुरुवातीला लस येणार; ४४० रुपयांना उपलब्ध होणार, तज्ज्ञांचा दावा

फुफ्फुसांच्या आजारांना लांब ठेवण्यााठी 'सेल्फ केयर टिप्स' ठरतील प्रभावी, नेहमी राहाल निरोगी

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य