WHO नं चिंता वाढवली! कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 04:33 PM2020-09-04T16:33:53+5:302020-09-04T16:40:29+5:30

CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याआधीही लसीबाबत चिंतानजनक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते.

WHO said that it does not expect widespread vaccinations of covid19 until mid-2021 | WHO नं चिंता वाढवली! कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य

WHO नं चिंता वाढवली! कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य

Next

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात गेल्या दोन ते तीन महिन्यात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूंशी लढण्याासाठी तसंच या माहामारीला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशात लसीच्या  शेवटच्या टप्प्यातील  चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे मधल्या काळात शास्त्रज्ञांमध्येही उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं.  दरम्यान रशियानं लस  यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला होता. चाचणीदरम्यान स्वयंसेवकांवर साईड इफेक्ट्स दिसून आल्यानंतर रशियाला टिकेला सामोरं जावं लागलं होतं. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याआधीही लसीबाबत चिंतानजनक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी कोरोना व्हायरसच्या लसीचे मोठ्या प्रमाणात  लसीकरण २०२१ मध्यापर्यंत शक्य नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना WHO च्या या दाव्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

याच आठवड्यात कोरोनावरील लसींना घाईघाईत परवानग्या दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापराच्या परवानग्या देत असल्याचं होतं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला होता.

परिणामकारकता आणि सुरक्षिततेबद्दल पूर्ण खात्री नसलेल्या कोरोना लसींचा वापर केल्यास त्याचे गंभीर साईड इफेक्ट दिसू शकतात. त्यामुळे कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देताना संबंधित प्राधिकरणांनी जबाबदारीनं निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं होतं.

अपुऱ्या चाचण्या झालेल्या लसींचा वापर केल्यास कोरोना संकटाचा शेवट होणार नाही. उलट हे संकट आणखी गंभीर होईल. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल,' असं स्वामीनाथन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. 

हिवाळ्यात कोरोना हाहाकार माजवणार, मृत्यूचे प्रमाणही वाढेल, WHOचा गंभीर इशारा

आता येत्या हिवाळ्यात कोरोना युरोपसह जगाच्या बर्‍याच भागांत कहर माजवेल. या काळात रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्यांची संख्या वाढेल आणि मृत्यूचे प्रमाणही वाढेल, असे जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)ने म्हटलं होतं.  युरोपमधील डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक हेनरी क्लुग म्हणाले  होते की, "हिवाळ्यामध्ये वृद्ध लोकांपेक्षा तरुण लोक या आजाराच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात सापडतील. आम्हाला अनावश्यक भाकीते करायची नाहीत, पण निश्चितच अशी शक्यता आहे." 

हेनरी क्लुग यांनी येत्या काही महिन्यांत तीन मुख्य कारणांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. यामध्ये शाळा पुन्हा सुरू करणे, हिवाळा-थंडीचा हंगाम आणि हिवाळ्यातील वृद्धांचा अधिक मृत्यूदर, त्यामुळे संसर्ग प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे. ते म्हणाले होते की, जगातील देशांनी त्यांच्या इशाऱ्यानुसार आतापासूनच तयारी करायला हवी. अमेरिकेत शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी संसर्ग पसरण्याच्या घटना घडल्या आहेत. मिसिसिपीच्या एका शाळेत 4000 मुले आणि 600 शिक्षकांना वेगळं ठेवण्यात आले होते.

हे पण वाचा-

दिलासादायक! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची 'नोवावॅक्स' लस ठरली सुरक्षित; चाचणीनंतर तज्ज्ञांचा दावा

coronavirus: कोरोना लसीसाठी कोव्हॅक्स योजना, ७६ देश सहभागी

'या' ६ प्रकारच्या समस्या असल्यास नुकसानकारक ठरू शकतं हळदीचं सेवन; वेळीच तब्येत सांभाळा

Web Title: WHO said that it does not expect widespread vaccinations of covid19 until mid-2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.