मायग्रेन बरा करण्यासाठी जेव्हा औषधही करणार नाही काम, तेव्हा दूध-जिलेबी ठरेल रामबाण! बाबा रामदेव यांनी सांगितला देशी उपचार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:57 IST2025-03-10T11:56:12+5:302025-03-10T11:57:38+5:30
सध्या बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, मायग्रेन समस्येवर मात करण्यासाठी एक अगदी सोपा आणि घरगुती उपाय सांगितला आहे...

मायग्रेन बरा करण्यासाठी जेव्हा औषधही करणार नाही काम, तेव्हा दूध-जिलेबी ठरेल रामबाण! बाबा रामदेव यांनी सांगितला देशी उपचार!
आजची आपली जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि बिघडलेल्या खानपानाच्या सवयी आदींचा आपल्या शरिरावर गंभीर परिणाम होत आहे. यातलाच एक आजार म्हणजे, मायग्रेन. यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी हळूहळू सुरू होऊन ती अधिक तीव्र होते, ही डोकेदुखी साधारणपणे डोक्याच्या एका बाजूला जाणवते, चीकबोन्समध्येही मायग्रेनचा त्रास जाणवतो. यासंदर्भात स्वामी बाबा रामदेव यांनी एक अगदी सोपा आणि चविष्ट उपचार सांगितला आहे. तर जाणून घेऊयात...
बाबा रामदेव यांचा उपचार -
सध्या बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, मायग्रेन समस्येवर मात करण्यासाठी एक अगदी सोपा आणि घरगुती उपाय सांगितला आहे. गायीच्या दुधापासून बनलेल्या देशी तुपात जिलेबी तयार करून खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी स्वतः जिलेबी तयारही करून दाखवली.
अशी तयार करा जिलेबी -
ही जिलेबी तयार करण्यासाठी आपल्याला मैद्यामध्ये बेसन आणि पनीर टाकून मिश्रण तयार करावे लागेल. यानंतर शुद्ध देशी तुपात जीलेबी तयार करता आणि पाक तयार करण्यासाठी साखरे ऐवजी देशी खांडचा वापर करा. यानंतर तयार झालेली जिलेबी 1 एक ग्लास दुधासोबत खा. जिलेबी दुधासोबत खाल्ल्याने औषधीचे काम करते. याशिवाय, हे आपल्या मुलांना रोज खाण्यासाठी दिल्यास, त्यांची ग्रोथ चांगली होईल आणि ते दिवसभर उत्साही राहतील.
मायग्रेनमुळे होणाऱ्या समस्या -
मायग्रेन असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका ही अधिक असतो. कारण मायग्रेन आणि हृदयविकार दोन्हींतही रक्तवाहिण्यांतून योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होऊ शकत नाही. यामुळे मायग्रेनमुळे मायोकार्डियल इन्फार्क्शन, हार्ट स्ट्रोक-अॅटॅक तसेच मृत्यूचा धोकाही असतो, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.