When doctor oxygen support risks his own life to save elderly critical patient 4 | रिअल हिरो! ...अन् कोरोनायोद्ध्यानं स्वतःचा ऑक्सिजन काढून वाचवले वृद्धाचे प्राण

रिअल हिरो! ...अन् कोरोनायोद्ध्यानं स्वतःचा ऑक्सिजन काढून वाचवले वृद्धाचे प्राण

कोरोना काळात कधीही न उद्भवलेल्या गंभीर प्रसंगाचा सामना जगभरातील लोकांना करावा लागत आहे.  कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी कोरोनायोद्ध्यांनी  जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पूर्ण केले. अजूनही रात्रंदिवस प्रयत्न करून आरोग्य सेवेतील कोविडयोद्धे आपलं कर्तव्य पूर्ण करत आहेत. अनेक डॉक्टरांना कोरोनाशी लढा देत असताना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशाच एक  कोरोना योद्ध्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका वयोवृध्द माणसासाठी  हे  डॉक्टर तारणहार ठरले आहेत. टाईम्स ऑफ इंडीयाच्या वृत्तानुसार या कोरोनायोद्ध्यांचे नाव डॉ. संकेत मेहता आहे. डॉक्टर संकेत  हे Anaesthetist तज्ज्ञ आहेत. 

ही घटना एका  ९ ऑगस्ट रोजी घडली. ७१ वर्षीय दिनेश पुरानी या  कोरोना रुग्णाला आपातकालीन स्थितीत ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता होती. साधारणपणे रुग्णाची स्थिती  अतिगंभीर झाल्यानंतर ३  मिनिटांच्या आत रुग्णांला ऑक्सिजन सपोर्ट देणं आवश्यक असतं. नाहीतर ब्रेन डेडची समस्या उद्भवू शकते. BAPS रुग्णालयात डॉ. मेहता यांनाही भरती करण्यात आलं होतं. कारण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांना श्वास घ्यायला  त्रास होत होता. 

रुग्णालयाचे सीईओ डॉ. पुरुषोत्तम कोराडीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरानी यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं तेव्हा त्यांनी स्थिती खूपच नाजूक होती. अशाच डॉक्टर प्रोटोकॉल पूर्ण करत होते. पुरानी यांना आईसीयूमध्ये नेण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी लागला. त्याचवेळी डॉ. मेहता यांनी आपलं High Flow Nasal Cannula ज्याद्वारे ते श्वास घेत होते. ते मशीन काढून पुरानी यांना दिले. डॉक्टरांचे प्रसंगावधान पाहून इतर  डॉक्टर आणि सगळा कर्मचारी वर्ग आश्चर्यचकित झाला. 

सध्या ७१ वर्षीय पुरानी हे व्हेंटिलेटरवर असून  त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तर डॉक्टर मेहता गेल्या दहा दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असूनही बोलायलाही जमत नाहीये.  त्यांना ६ लिटर ऑक्सिजनची प्रती मिनिटाला आवश्यकता असते. अशा स्थितीतही स्वतःचा ऑक्सिजन सपोर्ट देऊन वृद्धाची मदत केल्यामुळे डॉ. मेहता यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

हे पण वाचा-

खुशखबर! भारतातील सर्वात स्वस्त कोरोनाचं औषध Zydus Cadila कंपनीकडून लॉन्च; वाचा किंमत

स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: When doctor oxygen support risks his own life to save elderly critical patient 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.