शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

'या' तृणधान्याचे अंकुर आहेत उत्तम बॉडी डिटॉक्स, इतर फायदे ऐकल्यानंतर लगेच कराल उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:49 IST

व्हीटग्रास ज्यूस हा आपल्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. गव्हाचे अंकुर नियमित सेवन केल्याने आरोग्य तर चांगले राहतेच शिवाय अनेक गंभीर आजारांपासून शरीराचे रक्षण (Wheat Grass Benefits) होते.

धावपळीच्या जीवनशैलीत फिटनेस राखण्यासाठी अनेकांना वर्कआउट्स आणि अतिरिक्त गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे काहीजण सकस आहार घेऊन फिटनेस राखण्याचा प्रयत्न करतात. यासाठी व्हीटग्रास ज्यूस हा आपल्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. गव्हाचे अंकुर नियमित सेवन केल्याने आरोग्य तर चांगले राहतेच शिवाय अनेक गंभीर आजारांपासून शरीराचे रक्षण (Wheat Grass Benefits) होते.

गव्हाच्या अंकुरला व्हीटग्रास असेही म्हणतात. अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांसह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा ते एक चांगला स्रोत मानला जाते. व्हिटॅमिन ए, के, सी, ई, बी तसेच लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने देखील गव्हाच्या गवतामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. मात्र, फायदेशीर गोष्टींचा अतिवापर आरोग्यासाठी घातकही ठरू शकतो. हेल्थलाइनच्या मते, गव्हाचे अंकुर खाण्याचे फायदे-तोटे जाणून घेऊया.

विषारी घटक बाहेर पडतात -गव्हाचे अंकुर खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक शरीरातून बाहेर पडतात. ज्यांना शरीर डिटॉक्स करायचे आहे, त्यांच्यासाठी गव्हाचे अंकुर खाणे हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या आरोग्याच्या स्थितीबद्दल आणि तज्ज्ञांशी ते घेण्याबद्दल चर्चा नक्की करा.

पचनक्रिया मजबूत -गव्हाच्या अंकुरामध्ये भरपूर फायबर आणि एन्झाईम असतात. ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत, ते गव्हाचे अंकुर सेवन करू शकतात. यामुळे अन्न पचण्यास मदत होतेच, शिवाय गॅस, अॅसिडिटी या आजारांपासूनही आराम मिळतो.

गव्हाचे अंकुर चयापचय वाढवते -गव्हाचे अंकुर खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते. तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर गव्हाचे अंकुर आहाराचा एक भाग बनवून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढे पाऊल टाकू शकाल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी -व्हीटग्रास भरपूर पोषक असल्यामुळे शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास प्रभावी आहे. यासोबतच व्हीटग्रास सेवन शरीरासाठी एनर्जी बूस्टर म्हणूनही काम करते.

मधुमेहाशी लढण्यासाठी प्रभावी -मधुमेहाच्या रुग्णांसाठी गव्हाचे अंकुर खूप फायदेशीर ठरू शकतात. व्हीटग्रासचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

कसे आणि किती प्रमाणात घ्यावे -गव्हाचे अंकुर द्रव किंवा पावडरच्या स्वरुपात वापरले जाते. गव्हाचे अंकुर तुमच्या दिनक्रमात समाविष्ट करण्याचा विचार करत असाल, तर लक्षात ठेवा की त्याचे प्रमाण खूपच कमी असावे. जर तुम्ही व्हीट ग्रासचे थेंब घेत असाल तर द्रवाच्या 1-4 थेंबांनी सुरुवात करा. जर तुम्हाला पावडर वापरायची असेल तर 1 टीस्पून व्हीट ग्रास पावडर पुरेशी आहे.

गव्हाच्या अंकुराचे दुष्परिणाम -निरोगी आणि पोषक तत्वांनी समृद्ध असले तरी, व्हीटग्रास खाण्यास सुरुवात करता तेव्हा अनेकांना डोकेदुखी, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ताप येणे यासारख्या शारीरिक समस्या येऊ शकतात. गरोदर स्त्रिया आणि कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा संसर्ग असलेल्या लोकांनी व्हीटग्रास खाणे टाळावे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स