घश्यातील सूज आणि वेदना असू शकतं 'या' आजाराचं लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 07:29 PM2020-12-07T19:29:28+5:302020-12-07T19:49:29+5:30

Health News in Marathi : घशात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यावर वेदना होतात आणि घसा जड होतो.

What is tonsillitis know its symptoms causes and treatment | घश्यातील सूज आणि वेदना असू शकतं 'या' आजाराचं लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

घश्यातील सूज आणि वेदना असू शकतं 'या' आजाराचं लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

googlenewsNext

हिवाळ्यात टॉन्सिल्सची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. टॉन्सिल्सला सूज आल्यामुळे आपल्याला केवळ खाण्यापिण्याचा त्रास होत नाही तर आपल्याला बोलण्यातही खूप त्रास सहन करावा लागतो. आपल्या तोंडात घशाच्या मध्यभागी एक मऊ भाग आहे. याला टॉन्सिल्स म्हणतात. हे संरक्षण यंत्रणा म्हणून कार्य करते. हे शरीरात तोंडाद्वारे  होत असलेल्या बाह्य संसर्गास प्रतिबंधित करते. जर हा टॉन्सिल्स स्वतः बाह्य संसर्गाने संक्रमित झाला तर या अवस्थेस 'टॉन्सिलायटिस' म्हणतात. ओन्ली माय  हेल्थशी बोलताना डॉ. सव्यासाची सक्सेना यांनी या आजाराबाबत माहिती दिली आहे.

टॉन्सिलायटिसचे प्रकार

एक्यूट टॉन्सिलायटिस (Acute tonsillitis) 

एक्यूट टॉन्सिलायटिसमध्ये व्हायरसने टॉन्सिल्सना संक्रमित केलं जातं. यामुळे घश्यात सूज येते.  तसंच टॉन्सिल्समध्ये राखाडी किंवा पांढरा थर दिसून येतो.

क्रोनिक टॉन्सिलायटिस (Chronic tonsillitis)  

टॉन्सिल्स सतत संक्रमित झाल्यास क्रोनिक टॉन्सिलायटिसची स्थिती उद्भवते. त्यामुळे रुग्णांना तीव्र वेदनेचा सामना करावा लागतो. 

पेरिटॉन्सिलर  (Peritonsillar abscess)

या प्रकारात टॉन्सिल्सच्या आजूबाजूचे मास विकसित होते. हे या आजाराचे सगळ्यात गंभीर रूप आहे. याव्यतिरिक्त एक्यूट मोमोन्यूक्लिओसिस, स्ट्रे थ्रोट आणि टॉन्सिल्स स्टोन्ससारख्या समस्यांचा सामना  लोकांना करावा लागू शकतो.

लक्षणं

टॉन्सिल्स लाल दिसणं, सूज येणं, टॉन्सिल्सच्या जागेवर पांढरे किंवा राखाडी डाग येणं, खाताना, गिळताना त्रास होणं, घश्यात तीव्र वेदना, गंभीर स्थितीत ताप येणं, बोलायला  त्रास होणं, आवाज लहान होणं, श्वास घेताना दुर्गंधी येणं. 

लहान मुलांमध्ये दिसणारी लक्षणं

गिळायला त्रास होणं, खाण्यासाठी त्रास होणं, चिडचिड  होणे.

कारणं

घश्यात बॅक्टेरिया निर्माण झाल्यास किंवा व्हायरसचं संक्रमण झाल्यास ही समस्या उद्भवते. निमोनिया( Mycoplasma Pneumonia)मुळेही लहान मुलांमध्ये टॉन्सिलायटिस की समस्या निर्माण होते. थंड पदार्थांचा आहारात समावेश केल्यास किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास असा त्रास होतो. सावधान! गंजलेल्या पाईपांमधून येणारं पाणी प्यायल्यानं होऊ शकतो कॅन्सर; तज्ज्ञांचा दावा

डॉक्टर सव्यासाची सांगतात की या स्थितीत रुग्णावर भरपूर प्रमाणात फ्लुईडद्वारे उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. जर रुग्णाला ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते म्हणाले की जर ताप दोन दिवसांपेक्षा जास्त झाला तर डॉक्टर अँटीबायोटिक्सचा कोर्स देतात. बहुतेक स्थितीमध्ये ही समस्या 6 ते 7 दिवसांत बरी होते. त्यासाठी थंड आणि आंबट पदार्थ खाणे टाळा, जास्त त्रास झाल्यास आराम करा, गरम पदार्थ खा, घसा खवखवल्यास कोमट पाण्याने गुळण्या करा, धूम्रपान टाळा, संसर्ग टाळा, ज्या ठिकाणी हवा प्रदूषित आहे तेथे जाण्याचे टाळा.

उपाय

गरम पाण्यात लिंबू आणि आल्याचा रस  घालून या पाण्याचे  सेवन करा.

लसणाला पाण्यात घालून उकळून घ्या आणि या पाण्याने गुळण्या करा.

कोमट पाण्यात एक चिमूटभर मीठ मिसळून या पाण्याने गुळण्या करा.

घशात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यावर वेदना होतात आणि घसा जड होतो. अशात गरम पाण्याची वाफ घेणं फायदेशीर ठरतं. वाफ घेतल्याने घशाची खवखव, वेदना दूर होते. 'या' उपायाने ४५ टक्क्यांनी कमी होतोय जीवघेण्या व्हायरसचा धोका, संशोधनातून खुलासा

दोन  दिवसांपेक्षा जास्त घश्यात तीव्रतेने वेदना होत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

Web Title: What is tonsillitis know its symptoms causes and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.