घराची साफसफाई करायची म्हटली की, अनेकजण धुळीच्या अ‍ॅलर्जीमुळे आधीच भुवया उंचावतात. धुळीची अ‍ॅलर्जी असणे ही एक सामान्य समस्या आहे. धुळीच्या संपर्कात येऊन अनेक लोकांना अ‍ॅलर्जीची समस्या होऊ लागते. अनेकजण असेही आहेत ज्यांना ही समस्या होत नाही. पण जास्त वेळ धुळीत राहिल्याने त्यांनाही समस्या होऊ लागते. धुळीमध्ये अनेक नुकसानकारक कण असतात जे अ‍ॅलर्जीचं कारण ठरतात. 

(Image Credit : webmd.com)

जेव्हा हे धुळीचे कण श्वासांद्वारे शरीरात जातात तेव्हा इम्युनिटी वाढते आणि शरीर नुकसानकारक पदार्थां विरोधात अ‍ॅंटीबॉडीचं उत्पादन करते. शरीराची ही प्रक्रिया अ‍ॅलर्जीला कारणीभूत ठरते. याने शिंका येणे आणि नाक वाहणं सुरू होतं. अमेरिकेतील अस्थमा आणि अ‍ॅलर्जी फाउंडेशननुसार(AAFA), अशाप्रकारच्या अ‍ॅलर्जीमुळे अमेरिकेत जवळपास २० मिलियन लोक प्रभावित आहेत. अ‍ॅलर्जीच्या लक्षणां व्यतिरिक्त धुळीच्या संपर्कात आल्यावर सायनस इन्फेक्शन आणि अस्थमा होऊ शकतो.

काय असतात लक्षणे?

धुळीची अ‍ॅलर्जी असणे ही एक सामान्य समस्या आहे आणि आपल्यापैकी कितीतरी लोक या अ‍ॅलर्जीने ग्रस्त असतात. या अ‍ॅलर्जीला डस्ट माइट अ‍ॅलर्जी असंही म्हणतात. याची काही लक्षणे खालीप्रमाणे बघता येतील.

- धुळीच्या संपर्कात आल्यावर नाक वाहतं आणि नाकाला खाज येते.

- त्वचेवर खाज येते.

- चेहऱ्यावर वेदना होऊ शकतात.

- डोळ्यांना खाज येणे, पाणी येणे आणि डोळे लाल होणे.

- घशात खवखव होते. तसेच खोकलाही येतो.

- डोळ्यांना सूजही येऊ शकते. तसेच डोळ्याच्या खालच्या बाजूला लाल चट्टेही येऊ शकतात.

- श्वास घेण्यास त्रास होणे.

- बोलण्यास अडचण निर्माण होणे

धुळीच्या अ‍ॅलर्जीची कारणे

(Image Credit : healthpick.in)

धुळीमुळे होणारी अ‍ॅलर्जी नुकसानकारक पदार्थांसाठी इम्यूनिटी सिस्टीमची एक प्रतिक्रिया आहे. ज्या पदार्थांमुळे शरीर ही प्रतिक्रिया देतं त्याला अ‍ॅलर्जी म्हटलं जातं. जसे की, काही खाद्य पदार्थ, पगारगण आणि धुळीचे कण. घर कितीही स्वच्छ असलं तरी घरात धुळीचे कण असतातच. बेड, फर्निचरचे कुशन यात धुळ असते. तुम्ही जेवढे जास्त धुळीच्या संपर्कात याल तुमचं शरीर तेवढी जास्त प्रतिक्रिया देणार. त्यामुळे शक्य तेवढं धुळीपासून दूर रहा किंवा काळजी घ्या.

काय आहे यावर उपाय?

(Image Credit : medicalnewstoday.com)

धुळीच्या अ‍ॅलर्जीवर उपचार करणं गरजेचं आहे. या समस्येपासून बचाव करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे धुळीच्या संपर्कात येऊ नका. जर यानेही काही फरक पडत नसेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे तुम्ही घेऊ शकता. 

काय घ्याल काळजी?

- धुळीपासून होणाऱ्या अ‍ॅलर्जीपासून बचाव करायचा असेल तर ह्यूमिडिटी ३० आणि ५० टक्के दरम्यान ठेवण्यासाठी एअरकंडीशन किंवा ह्यूमिडिफायरचा वापर करा.

- चांगल्या क्वालिटीचं एअर फिल्टर वापरा.

- धुता येतील अशीच खेळणी खरेदी करा आणि वेळोवेळी धुवावे. 

(Image Credit : parenting.firstcry.com)

- अ‍ॅलर्जीपासून वाचवण्यासाठी उशीच्या कव्हर वेळोवेळी धुवाव्या.

- वेळोवेळी घराची स्वच्छता करा. याने धूळ दूर होईल आणि तुमचा अ‍ॅलर्जीपासून बचाव होईल.


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: What is reason of dust allergy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.