शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

ट्रिकोटिलोमेनिया काय आहे?; तुम्हीही डोक्यावरचे केस ओढत असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 05:31 IST

ट्रिकोटिलोमेनिया मुले आणि किशोरवयीनांमध्ये सामान्य आहे. लहान मुलांत हे आपोआप दूर होते.

डॉ. जय देशमुख, एमडी, एफसीपीएस,एमएनएएमएस

ट्रिकोटिलोमेनिया किंवा टीटीएम एक मनोवैज्ञानिक समस्या आहे. यात व्यक्ती नाइलाजाने आपलेच केस ओढतो किंवा उपटतो. ही समस्या ओबसेस्सिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डरअंतर्गत येते. हा आजार गंभीर झाल्यास व्यक्तीच्या व्यक्तित्व, जीवनाची गुणवत्ता आणि आनंदावर त्याचा मोठा प्रभाव पडतो.

हा कोणाला प्रभावित करतोट्रिकोटिलोमेनिया मुले आणि किशोरवयीनांमध्ये सामान्य आहे. लहान मुलांत हे आपोआप दूर होते. त्याचे गंभीर रूप १० ते १३ या वयोगटात प्रकट होते. वयस्कर व्यक्तीमध्ये हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आढळले आहे.

ट्रिकोटिलोमेनियापासून प्रभावित व्यक्ती कोणापासून पीडित होतात?आपल्या स्वत:च्या केसांना ओढल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, म्हणजे ओढल्याच्या ठिकाणी त्वचेत जळजळ, संक्रमण आणि हातांना इजा होते. टीटीएमच्या काही व्यक्ती आपल्या केसांना गिळून टाकतात आणि त्यांना ट्रायकोबेजॉर होण्याचा धोका म्हणजे पोटात हेअर बॉल्स होतात. नंतर मुलांना चिंता विकार, मनोदशा विकार, खाण्याचे विकार आणि व्यक्तित्व विकार होऊ शकतो.

दैनिक कामकाज कसे प्रभावित होते?हे शाळेतील उपस्थिती, सामाजिक कामकाजाला खराब करू शकते. अनेक मुले आणि युवक त्यांचे मित्र त्यांच्या टकलेपणाचा शोध लावतील हा विचार करून घाबरतात. केस ओढल्यामुळे कौटुंबिक जीवन प्रभावित होऊ शकते. कौटुंबिक वादाला वाढवू शकते. त्यामुळे तणाव वाढू शकतो. हे केस ओढण्याच्या आजाराला आणखी वाढवू शकते. टीटीएम असलेल्या व्यक्तीमध्ये केस ओढण्याची प्रबळ इच्छा होते. काही व्यक्ती आपले केस मुळापासून ओढतात, काही दाढी, पापण्या किंवा भुवयांचे केसही काढतात. काही व्यक्ती आपण ओढलेले केस खाऊन टाकतात. याला ट्रायकोफॅगिया नावाने ओळखण्यात येते. यामुळे गॅस्ट्रोइन टेस्टीनल ट्रेक्टच्या समस्या होतात.

काय आहेत मुख्य लक्षण? व्यक्ती आपले स्वत:चे केस ओढतो; पण त्याला त्याची जाणीव होत नाही. केस तुटल्यानंतर त्याला समाधान वाटते. वारंवार स्वत:ला थांबविण्याचा प्रयत्न सुरू असतो; पण तरीही केसांना ओढतो. आपल्या केसांमुळे तो नेहमी तणावात राहतो. अशा व्यक्तीच्या डोक्याच्या काही भागात  बघितल्यावर त्यात टक्कल पडल्याचे दिसून येते. 

जोखीम घेण्यासारखे काय आहे?काही लोकांना नकारात्मक भावनांचा त्रास होत असल्याने ते आपले केसं ओढतात. काहींमध्ये कौटुंबिक अनुवांशिकता हे देखील एक कारण होऊ शकते.  ट्रिकोटिलोमेनियासाठी बालपणीचा अपघातही जबाबदार असू शकतो. 

उपचार काय आहे?बरेच लोकं याचा उपचार करीत नाही. कारण ते याला एक सवय मानतात, आजार नाही. अन्य काही कारणे आहेत ज्यामुळे ते या आजाराचे निदान शोधत नाही. अशा स्थितीतील लोकांसाठी व्यवहार चिकित्सा व औषधी गुणकारी ठरू शकते. 

व्यवहार चिकित्सा काय आहे?तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हैबिट रिवर्सल थेरेपी ही व्यावहारिक चिकित्सेचा एक भाग आहे. ट्रिकोटिलोमेनियाच्या उपचारामध्ये ती प्रभावी ठरू शकते. यात जागरुकता प्रशिक्षण, प्रतिस्पर्धी प्रतिक्रिया प्रशिक्षण, प्रेरणा व अनुपालन, विश्राम प्रशिक्षण व सामान्यीकरण प्रशिक्षणाचा समावेश आहे. 

कुठल्या औषधी उपयोगी?या आजाराच्या उपचारावर फार कमी परीक्षण झाले आहे. वर्तमानात ट्रायकोटिलोमेनिया यावर महत्त्वपूर्ण उपचार व प्रभावी औषधाच्या रूपात ओलानजापाईन, एन-एसिटाईलसिस्टीन व क्लोमीप्रामाईन यांचा समावेश आहे. 

अडचण काय आहे?सदैव तणावात असणारे व आपला तणाव प्रदर्शित न करू शकणारे ट्रिकोटिलोमेनियाचे २० टक्के रुग्ण आपल्या केसांना खातात. याला ट्राईकोफैगिया असेही म्हटल्या जाते. ट्राइकोबेजोअर्स मध्ये उल्टी, मळमळ, पोटात दुखणे व आतड्यांमध्ये अवरोध व ॲनिमियाचा समावेश आहे. काही प्रकरणात त्यांना हेअर बॉलला काढण्यासाठी सर्जरीची आवश्यकता भासू शकते.