काय आहे सिकल सेल आजार? ज्यामुळे लग्न करू शकत नाहीयेत राजस्थानमधील काही लोक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:22 IST2025-01-14T11:22:16+5:302025-01-14T11:22:53+5:30

Sickle cell disease : हा आजार जास्तकरून आदिवासी भागांमध्ये अधिक बघायला मिळतो. महिला या आजाराच्या जास्त शिकार होतात.

What is sickle cell disease? know the symptoms and causes | काय आहे सिकल सेल आजार? ज्यामुळे लग्न करू शकत नाहीयेत राजस्थानमधील काही लोक! 

काय आहे सिकल सेल आजार? ज्यामुळे लग्न करू शकत नाहीयेत राजस्थानमधील काही लोक! 

Sickle cell disease : राजस्थानच्या ९ जिल्ह्यातील १०,७६४ लोक असे आहेत ज्यांची ओळख गुलाबी आणि निळ्या रंगाचं कार्ड आहे. या कार्ड्सना जेनेटिक काउन्सेलिंग आयडी कार्ड म्हटलं जातं. हे लोक एकमेकांसोबत लग्न करू शकत नाही. कारण त्यांना सिकल सेल आजार आहे. ज्या कधीच पूर्णपणे बरा केला जाऊ शकत नाही. 

हा आजार जास्तकरून आदिवासी भागांमध्ये अधिक बघायला मिळतो. महिला या आजाराच्या जास्त शिकार होतात. हा एक आनुवांशिक आजार आहे. हा आजार इतका खतरनाक आहे की, हळूहळू शरीरातील अवयव कमजोर करतो. अशात कमी वयातच रूग्णाचा जीव जाऊ शकतो.

काय आहे सिकल सेल आजार?

सिकल सेल आजार तुमच्या लाल रक्त पेशींमधील हीमोग्लोबिनला प्रभावित करतो. हा आजार झाल्यावर शरीर हीमोग्लोबिन बनवू शकत नाही. ज्यामुळे रक्त पेशी सिकलच्या आकाराच्या होतात. या पेशी रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. ज्यामुळे एनीमिया, वेदना, इन्फेक्शन, ऑर्गन फेलिअरचा धोका असतो. 

सिकल सेलची लक्षणं

सिकल सेलच्या मुख्य लक्षणात शरीरातील कोणत्याही अवयवात असह्य वेदना होतात आणि रक्तही कमी होतं. ज्यामुळे शरीराचा विकास होत नाही आणि फुप्फुसं, हृदय, डोळे, किडनी, हाडं आणि मेंदुसारखे अनेक अवयव प्रभावित होतात.

का करू शकत नाही लग्न?

सिकल सेल आजार पसरणं रोखण्यासाठी यानं पीडित असलेल्या लोकांना एकमेकांसोबत लग्न करण्यास मनाई आहे. हा एक जेनेटिक आजार आहे. अशात जर आई-वडिलांना हा आजार असेल तर त्यांच्या मुलांमध्येही वाढण्याचा धोका अधिक असतो.

फ्री वॅक्सीन

या आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी २ वॅक्सीनला सरकारनं मंजुरी दिली आहे. एक वॅक्सीनचं किंमत १० ते १२ हजार रूपये आहे. पण सरकार या वॅक्सीन फ्री देतं. मात्र, अजून या वॅक्सीनचं वितरण सुरू झालेलं नाही. हा आजार मुळापासून नष्ट होत नाही. केवळ त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो.

Web Title: What is sickle cell disease? know the symptoms and causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.