हिवाळ्यात जास्त खाता आणि झोपता का? सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरने असू शकता ग्रस्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:37 IST2024-12-23T15:36:00+5:302024-12-23T15:37:14+5:30
Seasonal affective disorder : एक्सपर्टनुसार, व्यक्तीमध्ये सीनजल अफेक्टिव डिसऑर्डरची लक्षणं सामान्यपणे थंड वातावरण आणि सूर्यप्रकाशाची कमतरता यामुळे दिसतात.

हिवाळ्यात जास्त खाता आणि झोपता का? सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरने असू शकता ग्रस्त!
Seasonal affective disorder : हिवाळ्यात बऱ्याच लोकांना सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरचा सामना करावा लागतो. हे एकप्रकारचं डिप्रेशन आहे. जे जास्तीत जास्त थंडीच्या दिवसात बघायला मिळतं. यादरम्यान व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक लक्षणं दिसतातं. हे एकप्रकारचं मूड डिसऑर्डर आहे.
एक्सपर्टनुसार, व्यक्तीमध्ये सीनजल अफेक्टिव डिसऑर्डरची लक्षणं सामान्यपणे थंड वातावरण आणि सूर्यप्रकाशाची कमतरता यामुळे दिसतात. अशात व्यक्तीला खूप जास्त थकवा, निराशा जाणवते.
त्याशिवाय याच्या लक्षणांमध्ये झोपेसंबंधी समस्या, खाण्याच्या सवयीमध्ये बदल जसे की, जास्त खाण्याची ईच्छा आणि एखाद्या गोष्टीवर फोकस न करता येणे. सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरमुळे व्यक्तीच्या मेंटल हेल्थवर वाईट प्रभाव पडतो. यादरम्यान मेंदुचा स्ट्रेस लेव्हल वाढतो.
सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर कसं कराल कंट्रोल?
- अशा व्यक्तींसोबत वेळ घालवा ज्यांना भेटून तुम्हाला आनंद मिळतो. अनेक आपण निराश किंवा उदास असतो तेव्हा स्वत:ला एखाद्या रूममध्ये बंद करून घेतो. पण असं करू नका. कारण एकटेपणामुळे तुमची निराशा आणखी वाढेल. त्यामुळे आवडीच्या लोकांसोबत वेळ घालवा.
- सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर दरम्यान व्यक्ती जास्त खाऊ लागतात. पण असं करू नका. कारण अनहेल्ही पदार्थांमुळे शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे हेल्दी पदार्थ खा.
- मूड रिफ्रेश करण्यासाठी घरातून बाहेर वॉक करायला जा. कारण ताज्या हवेत श्वास घेतल्याने तणाव दूर होतो.
- तसेच एखादं पुस्तक वाचा, चांगली गाणी ऐका, जिमला जा. जे तुम्हाला आवडतं असं काही काम करा.
- रोजचं एक शेड्यूल तयार करा. जसे की, वेळेवर जेवण करणं आणि वेळेवर झोपणं. यामुळे तुम्हाला कामाचा ताणही येणार नाही.
- झोप कमी लागणं किंवा जास्त झोप येणं हे एक सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरचं लक्षण आहे. यापासून बचावासाठी कॅफीनयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा.
- व्हिटॅमिन डी ची कमतरता डिप्रेशनची लक्षणं आणखी वाढवतं. त्यामुळे रोज सकाळी १० मिनिटं उन्हात बसा आणि सोबतच व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा.