काय आहे नोरोव्हायरस ज्याचा अमेरिकेत वाढतोय कहर? जाणून घ्या पूर्ण डिटेल्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:15 IST2025-01-01T12:14:23+5:302025-01-01T12:15:21+5:30

What Is Norovirus:नोरोव्हायरसला 'विंटर वोमिटिंग बग' (Winter vomiting bug) म्हटलं जातं. हा एक स्टमक व्हायरस आहे.

What is Norovirus, which is raising in America? Know the full details! | काय आहे नोरोव्हायरस ज्याचा अमेरिकेत वाढतोय कहर? जाणून घ्या पूर्ण डिटेल्स!

काय आहे नोरोव्हायरस ज्याचा अमेरिकेत वाढतोय कहर? जाणून घ्या पूर्ण डिटेल्स!

What Is Norovirus: सध्या अमेरिकेत नोरोव्हायरसच्या केसेस वाढत आहेत. डिसेंबरच्या सुरूवातीला ९० पेक्षा जास्त इन्फेक्शनच्या केसेस नोंदवण्यात आल्या. लॉस एंजलिसच्या एका रेस्टॉरंन्टमध्ये एक सिग्निफिकेंट आउटब्रेक झाला. जिथे ब्रिटीश कोलंबिया, कॅनडामधून मागवण्यात आलेल्या कच्च्या शिंपल्यामुळे ८० लोकांना इन्फेक्शन झालं. हे शिंपले परत मागवण्याआधी १४ अमेरिकन राज्यांमध्ये वाटण्यात आले होते.

काय आहे नोरोव्हायरस?

नोरोव्हायरसला 'विंटर वोमिटिंग बग' (Winter vomiting bug) म्हटलं जातं. हा एक स्टमक व्हायरस आहे. जो दूषित जेवण, पाणी किंवा सर्फेसच्या माध्यमातून मुख्य रूपानं ओरल-फीकल रूटच्या माध्यमातून पसरतो. हा व्हायरस कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो. अमेरिकेत हा फूड बॉर्न डिजीजचं एक मुख्य कारण आहे. क्रूज शिप, नर्सिंग होम आणि डॉरमेट्रीसारख्या बंद ठिकाणांवर याचा जास्त धोका असतो.

नोरोव्हायरसची लक्षणं

या व्हायरसची लक्षणं सामान्यपमे एक्सपोजरच्या १-२ दिवसांनंतर दिसतात आणि यात उलटी, जुलाब, मळमळ, पोटदुखी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी यांचा समावेश आहे. गंभीर स्थितीत डिहायड्रेशन होऊ शकतं. खासकरून तरूण आणि वयोवृद्धांमध्ये.

उपाय

नोरोव्हायरस इन्फेक्शन आणि आउटब्रेक रोखण्यासाठी स्वच्छतेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. 

१) शौचालयाचा वापर केल्यानंतर किंवा अन्नाला हात लावण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावे.

२) चांगल्या फिनाइलचा वापर करून फ्लोर स्वच्छ करावं.

३) स्टीम फूड खाणं टाळा किंवा केवळ क्लोरीनयुक्त पाण्यावर निर्भर राहू नका. कारण नोरोव्हायरस ६० डिग्री सेल्सिअसपर्यंत उष्णतेचा सामना करू शकतो. 

४) आउटब्रेक दरम्यान इन्फेक्शन झालेल्या लोकांना वेगळं ठेवलं पाहिजे. त्यांनी जेवण बनवणं टाळलं पाहिजे. 

Web Title: What is Norovirus, which is raising in America? Know the full details!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.