Hanta Virus : उंदरांमुळे पसरणारा हंता व्हायरस किती धोकादायक?; जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:45 IST2024-07-29T13:36:27+5:302024-07-29T13:45:01+5:30
Hanta Virus : हंता व्हायरस किती धोकादायक आहे आणि तो कसा टाळता येईल याबद्दल जाणून घेऊया...

Hanta Virus : उंदरांमुळे पसरणारा हंता व्हायरस किती धोकादायक?; जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार
उंदरांमुळे पसरणाऱ्या हंता व्हायरसमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. रिपोर्टनुसार, १ जानेवारी ते १ जुलै २०२४ पर्यंत, सात लोकांना हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम (HPS) चा संसर्ग झाला आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तीन रुग्ण एरिझोना येथील आहेत. आरोग्य विभागानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. HPS हा श्वसनाचा गंभीर आजार आहे. हा व्हायरस किती धोकादायक आहे आणि तो कसा टाळता येईल याबद्दल जाणून घेऊया...
हंता व्हायरस म्हणजे काय?
हा व्हायरस ग्रँड कॅन्यन राज्यात आढळणाऱ्या उंदरांमुळे पसरतो. एकदा संसर्ग झाल्यानंतर, एखाद्याला ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखू शकतात, ज्यामुळे श्वासोच्छवासाचा देखील त्रास होऊ शकतो. हंता व्हायरस हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नसला तरी तो एका ठिकाणापुरता मर्यादित नाही, त्यामुळे तो धोकादायक बनतो.
हंता व्हायरसची लक्षणं
हंता व्हायरसचा संसर्ग झाल्यास थकवा, ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजणं, मळमळ, उलट्या आणि पोटदुखी यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. यानंतर, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. रेनल सिंड्रोम (HFRS) सह तापाची लक्षणं १ ते ८ आठवड्यांनंतर दिसून येतात. त्यामुळे अस्पष्ट दिसू लागतं. गंभीर प्रकरणांमध्ये, लो ब्लड प्रेशर आणि किडनी फेल होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
हंता व्हायरसवर उपचार
सीडीसीच्या मते, हंता व्हायरससाठी कोणतेही विशिष्ट उपचार किंवा लस नाही. जर संक्रमित व्यक्ती लवकर ओळखली गेली तर ती लवकर बरी होण्यास मदत होते. त्याच वेळी, जेव्हा रुग्णांची प्रकृती गंभीर होते किंवा श्वासोच्छवासाच्या समस्या असल्यास ऑक्सिजन थेरपी दिली जाते.
हंता व्हायरस मृत्यू दर
सीडीसीच्या मते, हंता व्हायरसचा मृत्यू दर ३८% आहे. हा आजार ओळखण्यासाठी एक ते आठ आठवडे लागू शकतात. आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.