काय आहे कॉन सिंड्रोम, जो किडनी आणि हृदयावर एकत्र करतो गंभीर प्रभाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 15:47 IST2024-07-29T15:46:40+5:302024-07-29T15:47:10+5:30
Conn Syndrome: ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरात एल्डोस्टेरॉन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. या हार्मोनमुळे शरीरात सोडिअम आणि पोटॅशिअमचं संतुलन कायम ठेवण्यास मदत मिळते.

काय आहे कॉन सिंड्रोम, जो किडनी आणि हृदयावर एकत्र करतो गंभीर प्रभाव?
Conn Syndrome: आजार वेगवेगळ्या प्रकारचे असतात पण त्यांबाबत लोकांना फार काही माहिती नसते. अशाच एक आजार म्हणजे कॉन सिंड्रोम. ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरात एल्डोस्टेरॉन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. या हार्मोनमुळे शरीरात सोडिअम आणि पोटॅशिअमचं संतुलन कायम ठेवण्यास मदत मिळते. पण जेव्हा याचं प्रमाण खूप जास्त वाढतं तेव्हा याने किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.
कॉन सिंड्रोमची लक्षणे
हाय ब्लड प्रेशर होणं, डोकेदुखी, कमजोरी, सतत थकवा, लघवीमध्ये पोटॅशिअम कमी होणं आणि मांसपेशींमध्ये वेदना होणं ही याची लक्षणं आहेत. ही लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
किडनीवर दबाव
कॉन सिंड्रोममुळे किडनीवर जास्त प्रभाव पडतो. जास्त एल्डोस्टेरोनमुळे किडनीमध्ये सोडिअम वाढतं, ज्यामुळे शरीरात पाणी थांबतं आणि ब्लड प्रेशर वाढतं. यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि किडनी फेल होण्याचा धोकाही वाढतो.
हृदयावर प्रभाव
कॉन सिंड्रोमुळे हृदयावरही फार वाईट प्रभाव पडतो. सतत हाय ब्लड प्रेशर राहिल्याने हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि इतर हृदयरोगांचा धोका वाढतो. पोटॅशिअम कमी झालं तर हृदयाच्या ठोक्यांमध्येही गडबड होते. जे घातक ठरू शकतं.
काय कराल उपाय?
कॉन सिंड्रोमवर उपचार औषधं आणि लाइफस्टाईलमध्ये काही बदल करून केला जाऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधं घ्या आणि आराम करा. संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.