रात्री फळं खावीत की नाही? जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:20 IST2024-12-17T12:19:34+5:302024-12-17T12:20:09+5:30

Fruits Eating : फळं कोणत्या वेळी खावेत आणि कोणत्या वेळी नाही, याबाबत लोक कन्फ्यूज असतात. काही लोक म्हणतात की, फळं रात्री खावीत तर काही लोक म्हणजे रात्री फळं खाणं नुकसानकारक असतं. 

What is a right time to eat fruits? you should know | रात्री फळं खावीत की नाही? जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ!

रात्री फळं खावीत की नाही? जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ!

Fruits Eating : फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. नियमितपणे वेगवेगळ्या फळांचं सेवन करण्याचा आणि ज्यूस पिण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. पण फळं कोणत्या वेळी खावेत आणि कोणत्या वेळी नाही, याबाबत लोक कन्फ्यूज असतात. काही लोक म्हणतात की, फळं रात्री खावीत तर काही लोक म्हणजे रात्री फळं खाणं नुकसानकारक असतं. 

कधी खावीत फळं?

एक्सपर्टनुसार फळं खाण्याची सगळ्यात योग्य सकाळी उपाशीपोटी असते. सकाळी फळं खाल्ल्याने पचनक्रिया सक्रिय होते. जेवण करण्याआधीही तुम्ही फळं खाऊ शकता. असं केल्यानेही पचनक्रिया चांगली होते. तर जेवण केल्यानंतर फळं खाल्ल्याने पचनक्रिया स्लो होऊ शकते. फळं तुम्ही सायंकाळी नाश्त्याच्या रूपातही खाऊ शकता.

कधी खाऊ नये फळं?

फळं रात्री खाणं टाळलं पाहिजे. रात्री फळं खाल्ल्याने गॅस आणि अपचनाची समस्या होऊ शकते. तसेच जेवण केल्यावर लगेच फळं खाणंही चुकीचं आहे. असं केल्यास पोटात जडपणा जाणवू शकतो. जर तुम्ही रात्री फळं खात असाल तर झोपण्याच्या तीन तास आधी फळं खावीत. जर फळं खात असाल तर ताजी आणि सीझनल फळं खावीत. 

फळं खाण्याचे फायदे

फळं खाण्याचे वेगवेगळे फायदे होतात. वेगवेगळ्या फळांपासून शरीराला वेगवेगळे पोषक तत्व मिळतात. सोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. ज्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते. फळांमध्ये नॅचरल शुगर असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ताजी फळं खाल्ल्याने एकंदर आरोग्य चांगलं राहतं.

Web Title: What is a right time to eat fruits? you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.