वजन कमी झाल्यानंतर शरीरावर काय होतात परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 03:04 PM2019-10-31T15:04:51+5:302019-10-31T15:05:30+5:30

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत करत असतात. वजन कमी केल्यानंतर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करणं शक्य होतं.

What happens in your body when you loose weight | वजन कमी झाल्यानंतर शरीरावर काय होतात परिणाम?

वजन कमी झाल्यानंतर शरीरावर काय होतात परिणाम?

googlenewsNext

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत करत असतात. वजन कमी केल्यानंतर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करणं शक्य होतं. त्याचबरोबर याचा आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणामही दिसून येतो. तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा तुम्ही वेट लॉस डाएट प्लान फॉलो करता त्यावेळी आपलं वजन जवळपास 4 ते 5 किलो कमी होतं. पण कधी विचार केलाय का? याचा शरीरावर कसा परिणाम होतो. वजन कमी केल्यानंतर शरीराची कोलेस्ट्रॉल लेव्हल, ब्लड प्रेशर कमी राहते. 

वजन वाढल्यानंतर उद्भवलेल्या सर्व समस्या दूर होतात. शरीरावरील अतिरिक्त वजन कमी झाल्यानंतर तुमच्या लूकसोबतच आरोग्यही हेल्दी राहतं. जाणून घ्या यामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात...? 

झोपेच्या समस्या होतात दूर... 

जेव्हा वजन जास्त वाढतं त्यावेळी झोपल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरामध्ये असलेल्या फॅट्समुळे श्वास घेताना समस्यांचा सामना करावा लागतो. 4 ते 5 किलो वजन कमी झाल्यानंतर तुम्ही पहिल्यापेक्षा उत्तम आणि शांत झोप घेऊ शकता. शरीरातील कार्टिसोल हार्मोन्स कमी होतात. ज्यामुळे अजिबात तणाव राहत नाही. तुमच्यामध्ये गोड पदार्थ खाण्याची सतत होणारी इच्छा म्हणजेच, क्रेविंगही कमी होते. परिणामी शांत झोप लागते. 

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी... 

जेव्हा तुम्ही अनेक महिने वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असता आणि 4 ते 5 किलो वजन कमी करता. त्यावेळी मानसिकरित्या आनंद आणि शांतता जाणवते. यामुळे तुम्ही मोटिवेटेड होतात. तणाव कमी होतो. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढतो. या सर्व गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 

हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 

वजन कमी केल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. शरीरामध्ये फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. ज्यामुळे तुम्ही हृदयरोगांपासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच वजन कमी केल्यानंतर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. 

डायबिटीसपासून बचाव होतो

ज्या लोकांचं वजन जास्त असतं. त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता अधिक असते. ब्लड शुगर लेव्हलही वाढते. जेव्हा तुमचं वजन 4 ते 5 किलो कमी असतं. तेव्हा ब्लड शुगर लेव्हल कमी होतं. तसेच इन्सुलिन लेव्हलही नियंत्रणात राहतं. 

आर्थरायटिसपासून बचाव

जेव्हा तुमच्या शरीराचं वजन अधिक असतं. तेव्हा हाडं आणि शरीराच्या सांध्यांवर जास्त प्रेशर येतं. जसं शरीराचं वजन कमी होतं. त्यावेळी सांध्यांवरील दबाव कमी होतो. वजन कमी झाल्यामुळे सांध्यांच्या समस्याही दूर होतात. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: What happens in your body when you loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.