शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हार्ट बिट्सच्या लाइन काय बरं सांगतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 12:12 IST

तीच लाईन सरळ झाली तर तुम्ही जिवंत नसता.

लव्हली शर्मा, (संकलन : महेश घोराळे)

जीवन हे कोणाचेही लक्ष्य असू शकत नाही. तर जीवन हा एक प्रवास आहे. हा प्रवास कुणी ‘भागदौड’ करून पूर्ण करतो, कुणी चालत, कुणी कायम चिंतित राहून तर कुणी हसत खेळत पूर्ण करतो. त्यामुळे कसे जगायचे हे तुम्हीच ठरवू शकता. पण एक मात्र खरे आहे की, प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात चढ-उतार  असतातच. त्याशिवाय जीवन नाही. आपल्या हार्ट बिट्सच्या लाईन तुम्ही पाहा. त्यामध्ये चढउतार  दिसतो तोपर्यंत तुम्ही जिवंत असता. तीच लाईन सरळ झाली तर तुम्ही जिवंत नसता.

मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण आज लोक नुसते सैरावैरा धावत आहेत. घड्याळाच्या काट्यावर ते पळत सुटत आहेत. ‘काम आहे’ असे म्हणत ते नीट जेवतही नाहीत. स्वतःच्या आयुष्याला द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ही धावपळ कशासाठी?  तुम्हाला जायचे तरी नेमके कुठे? 

मौन बाळगायला शिका

कुणी नाराज होऊन तुमच्याशी बोलत असेल तर तुम्हीही आक्रमक होऊन लगेच त्याला उत्तर देऊ नका. एकदा त्याला पूर्णपणे ऐकून घ्या. त्याला समजून घ्या. तो शांत होईल तेव्हा तुमचा विचार मांडा, त्याला समजावून सांगा. हे एक कौशल्य आहे. अनेकदा व्यर्थ बोलल्यामुळे प्रश्न उपस्थित होतात, त्याचा मनस्ताप भोगावा लागतो. त्यामुळे योग्य वेळी पण मोजकं बोला, मौन बाळगायला शिका.

पाहिलं तर सर्व काही, मानलं तर काहीच नाही

- पाहिलं तर सर्व काही आहे आणि मानलं तर काहीच नाही, अशी स्थिती आहे, त्यामुळे समाधानी राहणं शिकलं पाहिजे.

- पैसा संपत्ती या गोष्टी येतात आणि जातात पण तुमचे नाव, प्रतिमा कायम राहते.   

- तुमच्याजवळ जे चांगले, मित्र, नातेवाईक आहेत, त्यांना भरपूर वेळ द्या. कारण तुम्हालाही कुणाच्यातरी वेळेची गरज असेल.

- भविष्याची चिंता करून आजचा दिवस खराब करू नका.  

- नुसत्या विचाराने किंवा नशीब, भविष्यावर विश्वास ठेवून काही होणार नाही, त्यासाठी मेहनत करावी लागेल.  

- जेव्हा तुम्हाला वाटेल की माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. तेव्हा त्या लोकांकडे पाहा ज्यांना हातपाय नाहीत.  

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजना