(Image Credit : texasmigraineclinic.com)

काही लोकांना अनेकदा असं जाणवतं की, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्याच वस्तू फिरत आहेत. कधी सगळं काही धुसर तर कधी काहींना पायऱ्या चढताना चक्कर येऊ लागते. तुम्हालाही असं होत असेल तर वेळीच सावध व्हा. असं होण्याला बॅलन्स डिसऑर्डर म्हणतात. याला सामान्य भाषेत चक्कर येणे असंही म्हणता येऊ शकतं. पण ही समस्या का होते? याची कारणे काय आहेत? हे जाणून घेऊ...

काय आहे बॅलन्स डिसऑर्डर?

(Image Credit : franklinrehab.com)

बॅलन्स डिसऑर्डर स्थितीत व्यक्तीला अचानक चक्कर येऊ लागणे किंवा संतुलन बिघडण्याची समस्या असते. ही समस्या होण्याची अनेक कारणे असू शकतात. ज्यातील काही आजारांपासून ते औषधांचाही समावेश असू शकतो. कानातील काही असे भाग जे संतुलन ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यांना वेस्टिब्यूलर सिस्टीम म्हटलं जातं. ही सिस्टीम डोळे, जॉइंट्स आणि हाडांसोबत मिळून काम करते. पण जेव्हा ही सिस्टीम बिघडते, तेव्हा बॅलन्स डिसऑर्डरची स्थिती तयार होते.

बॅलन्स डिसऑर्डरचे प्रकार

(Image Credit : epainassist.com)

बॅलन्स डिसऑर्डर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यात बिनाइन पॅरोक्जिमल पोजिशनल वर्टिगो, लिब्रिन्थायटिस, मॅनियर्स डिजीज, वेस्टिब्यूलर न्यूरोनायटिस आणि मोशन सिकनेस इत्यादींचा समावेश आहे.

काय असतं याचं कारण?

कानात जर एखाद्या प्रकारचं व्हायरल किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन, डोक्याला झालेली जखम, मेंदूला अडचण निर्माण करणारं ब्लड सर्कुलेशन किंवा वाढत्या वयामुळेही बॅलन्स डिसऑर्डरची समस्या होऊ शकते.

लक्षणे

(Image Credit : sfaudiology.com)

बॅलन्स डिसऑर्डर झाल्यास तुम्हाला तुम्ही पडत असल्यासारखी जाणिव होते, चक्कर येणे किंवा डोकं फिरू लागतं. डोक्याला हलकं वाटणे, उलटी होणे, अंधारी येणे, हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशरमध्ये चढउतार येणे, घाबरल्यासारखं वाटणे, तणाव येणे ही लक्षणे दिसतात.

काय करावे?

(Image Credit : medicalxpress.com)

अशाप्रकारची काही लक्षणे तुम्हाला दिसून येत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर अशा स्थितीत तुम्हाला विशेष टेस्टचा सल्ला देऊ शकतात. नाक, कानाच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही केसेसमध्ये लक्षणे अधिक काळ दिसतात. पण वेळीच काळजी घेतली तर तुमची ही समस्या दूर होऊ शकते. 


Web Title: What is balance disorder? Know symptoms, causes and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.