अंडरविअरबाबत पुरूषांनी कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात? वाचाल तर रहाल फायद्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:38 IST2026-04-11T10:37:38+5:302026-04-11T10:38:25+5:30
Underwear Tips : अंडरविअरबाबत पुरूष फार निष्काळजी असतात. एकच अंडरविअर अनेक दिवस वापरतात किंवा अंडरविअर खरेदी करताना फारसा विचार करत नाहीत. याबाबतीत महिला अधिक सजग असतात. त्यामुळे आज आम्ही पुरूषांना अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या त्यांना माहीत असणं गरजेचं आहे.

अंडरविअरबाबत पुरूषांनी कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात? वाचाल तर रहाल फायद्यात...
Underwear Tips : अंडरविअर हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असतात. अंडरविअर आणि बनियान अशा गोष्टी आहेत ज्यांचा वापर सगळेच रोज आंघोळीनंतर करतात. पूर्वीपेक्षा हल्ली बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या, डिझाइनच्या आणि वेगळ्या कापडांच्या अंडरविअर बघायला मिळतात. अलिकडे अंडरविअर कशी असावी याला फारच महत्व दिलं जातं. अंडरविअरचा संबंध आपल्या आरोग्याशी असतो. पण तरी सुद्धा अंडरविअरबाबत मोकळेपणाने बोललं जात नाही. ही चर्चा नेहमी दबक्या आवाजातच होते. पण हे चुकीचं आहे. काही रिसर्चमधून असं समोर आलंय की, अंडरविअरबाबत पुरूष फार निष्काळजी असतात. एकच अंडरविअर अनेक दिवस वापरतात किंवा अंडरविअर खरेदी करताना फारसा विचार करत नाहीत. याबाबतीत महिला अधिक सजग असतात. त्यामुळे आज आम्ही पुरूषांना अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या त्यांना माहीत असणं गरजेचं आहे.
अंडरविअर प्रत्येक रंग, डिझाइन आणि साइजमध्ये मिळतात. जगभरात अंडरविअरचा बाजारही वाढला आहे. अंडरविअर कुणी खरेदी करत नाही असं शोधूनही सापडणार नाही. पण तरी सुद्धा बरेच लोक याबाबत जास्त काही बोलत नाहीत. चला जाणून घेऊ असे काही प्रश्न जे विचारण्यात अनेकजण अडखळतात.
दोन दिवस एकच अंडरविअर घालणे किती वाईट?
अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, लागोपाठ दोन दिवस एकच अंडरविअर घातली जाऊ शकते. याने आरोग्याला काही फार नुकसान होत नाही. जर अंडरविअर स्वच्छ आहे तर तुम्ही ती न धुताही पुन्हा वापरू शकता. पण जर तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्या असेल किंवा तुम्हाला जास्त घाम येत असेल तर अंडरविअर रोज बदलली पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.
फॅब्रिकने काही फरक पडतो का?
होय नक्कीच. अंडरविअरच्या फॅब्रिकचा तुमच्या आरोग्यावर प्रभाव पडतो. सामान्यपणे कॉटनच्या मुलायम कापडाच्या अंडरविअर वापरण्याचा सल्ला दिला जातो. याने तुम्हाला येणारा घाम सुकतो आणि हवाही खेळती राहते. काही खेळाडूंना सिंथेटिक आणि पॉलिएस्टरच्या फॅब्रिकपासून तयार अंडरविअर घालणं सहज वाटतं.
बॉक्सर्स किंवा ब्रीफ्स काय जास्त चांगलं?
फॅशन आणि कम्फर्टला थोडावेळ बाजूला ठेवा. या दोन्हींबाबत चर्चा ही होते की, यांनी स्पर्म प्रॉडक्शनवर काही प्रभाव पडतो का? रिसर्च सांगतात की, स्पर्म प्रॉडक्शनमध्ये अधिक तापमानाची भूमिका असते आणि अंडरविअर घातल्याने असंच होतं. तापमान जास्त असेल तर स्पर्मची निर्मिती कमी होते आणि स्पर्म कमजोर होतात.
जर अंडरविअर वापरलीच नाही तर?
एका सर्व्हेनुसार, एक चतुर्थांश अमेरिकन कधी-कधी अंडरविअर न घालताच बाहेर पडतात. एक्सरसाइजदरम्यान जर तुमचे कपडे फिट असतील आणि तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्या नसेल तर तुम्ही अंडरविअर वापरली नाही तरी चालेल.
कशी असावी अंडरविअर?
जर अंडरविअर स्वच्छ आणि कोरडी असेल तर दुसऱ्या दिवशीही वापरता येऊ शकते. जर तुम्हाला त्वचेसंबंधी समस्या असेल किंवा घाम जास्त येत असेल तर इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी धुतलेली अंडरविअर वापरा. एक्सरसाइज वेळी अंडरविअरची निवड विचार करून करा. कॉटनची आणि तुम्हाला सहज वाटेल अशी अंडरविअर वापरावी. अंडरविअरसाठी जास्त फॅशनचा विचार करू नका, तशीही ती दिसत नाही.