शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

उपवास केल्याने शरीराला काय फायदे मिळतात? वाचाल तर नेहमीच कराल उपवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:43 IST

Fasting Benefits : उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. अशात आज आपण उपवास करण्याचे शरीराला काय काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

Fasting Benefits : श्रावण सुरू होणार आहे. अशात जास्तीत जास्त लोक सोमवारी उपवास करतात. अनेकजण दिवसभर काहीही न खाता फक्त पाणी पितात आणि दिवसाच्या शेवटी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात. याशिवाय अनेकजण आठवड्यातून एका दिवशी उपवास धरतात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. अशात आज आपण उपवास करण्याचे शरीराला काय काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

उपवासाचं महत्व

आयुर्वेदासहीत दुसऱ्या सर्वच चिकित्सेमध्ये उपवास म्हणजेच पोट रिकामं ठेवण्याची प्रथा आहे. याचा अर्थ हा नाही की प्रत्येक आजारावर उपाय म्हणून उपवास केला जावा, पण अनेक समस्यांवर उपवास हा चांगला उपचार ठरतो. आयुर्वेदात आजार दूर करण्यासाठी शरीरातील विषारी तत्व दूर करण्याबाबत सांगण्यात आलं आहे आणि उपवास केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर निघण्यास मदत मिळते. त्यामुळेच उपवासाला आयुर्वेदात सर्वोत्तम औषधी मानलं आहे. 

हे आजार केले जाऊ शकतात दूर

जर तुम्ही पूर्ण नियमाने उपवास केला तर याने तुमची पचनक्रियाच चांगली होतेच सोबतच अनेक आजारांपासूनही सुटका मिळते. उपवास केल्याने आर्थरायटिस, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर, सततचा थकवा, कोलायटिस, स्पास्टिक कोलन, इरिटेबल बॉवेल आणि अनेक प्रकारच्या मानसिक आजारांपासूनही सुटका मिळते. 

वजन कमी होतं

उपवास केल्याने शरीराचा लठ्ठपणा कमी होतो. जेवणाच्या पद्धतीत बदल करून उपवास केल्यास फॅट सेल बर्न करण्यास मदत होते. साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्याचे शरीराला संकेत मिळतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचे असेल तर अॅथलेट्स उपवास करतात.

इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते

उपवास केल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कार्बोहायड्रेड (साखर) सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते. उपवास केल्याने इन्सुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी सेल्सना संकेत देतात, असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

मेटाबॉलिज्झची बूस्ट होतं

उपवास केल्याने पचनशक्तीला जरा आराम मिळतो. त्यामुळे मेटाबॉलिझमला कॅलरी बर्न करण्यासाठी संधी मिळते. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर फॅट बर्न करण्यासाठी आणि फूड मेटाबॉलाईज करण्याची क्षमता कमी होते. उपवास केल्याने मेटाबॉलिझमची कार्यक्षमता वाढते.

मेंदुच्या क्रिया वाढतात

उपवास केल्याने ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर (BDNF) नावाचे प्रोटिनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते. या प्रोटिनने मेंदुची गती वाढते. कार्य चांगल्या पद्धतीने पार पडते

इम्युन सिस्टीममध्ये सुधारणा

कॅन्सर सेल्सचे फॉरमेशन थांबवणे, फ्रि रॅडिकल डॅमेज कमी करणे, शरीरातील इन्फ्लेमेटरी कंडीशन नियंत्रित करणे आदी कार्ये उपवासातून साध्य केली जाऊ शकतात. जर एखादा प्राणी आजारी पडला तर तो आराम करण्याऐवजी आधी खाणे बंद करतो. कारण शरीरातून त्याला इंटर्नल सिस्टिमवरील ताण कमी करण्याचे अंतर्गत संकेत मिळतात. त्यामुळे शरीर एखाद्या इन्फेक्शनला जोमाने लढा देऊ शकते.

शरीरिक क्षमता वाढतात

वेगवेगळ्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपवास महत्त्वाचा असतो. शरीरातील पचन तंत्रात अन्न कमी असेल तर शरीरात जास्त एनर्जी राहू शकते. त्याने काम करण्याची ऊर्जा वाढते. मन संतुलित राहते. नवनवीन कल्पना मनात जन्म घेतात आणि सोबतच वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा उत्साह सुद्धा वाढतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य