वजन कमी करायचंय? 'या' सोप्या गोष्टीची लावा सवय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 11:42 IST2019-08-28T11:33:15+5:302019-08-28T11:42:18+5:30
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज केल्या जातात. धावणे, चालणे, योगा, सायकलिंग, अॅरोबिक्स अशा कितीतरी एक्सरसाइज सांगितल्या आणि केल्या जातात.

वजन कमी करायचंय? 'या' सोप्या गोष्टीची लावा सवय...
(Image Credit : quickanddirtytips.com)
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज केल्या जातात. धावणे, चालणे, योगा, सायकलिंग, अॅरोबिक्स अशा कितीतरी एक्सरसाइज सांगितल्या आणि केल्या जातात. या सगळ्या एक्सरसाइजने तुमचं आरोग्य चांगलं राहतं. पण अनेकांना या गोष्टी करणं शक्य होतंच असं नाही. तुम्हाला हेही माहीत आहे की, जास्तवेळ एकाच जागी बसून राहिल्याने आरोग्य बिघडतं आणि लठ्ठपणाही वाढतो. तसेच यापेक्षाही गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. पण फिट राहण्याची गरज तर आहेच. अशात एक अशीही एक्सरसाइज आहे, ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यात आणि फिट राहण्यासही मदत होते. ती एक्सरसाइज म्हणजे उभं राहणं. चला जाणून घेऊ याचे फायदे...
उभे राहण्याचे काय होतात फायदे?
वजन वाढण्याची शक्यता कमी
हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी
कंबरदुखीपासून आराम
फॅट बर्न
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बेस्ट एक्सरसाइज उभे राहणे
(Image Credit : nydailynews.com)
जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्ही बसण्याच्या तुलनेत अधिक कॅलरी बर्न करू शकता. कारण उभे राहण्यादरम्यान तुमचे मसल्स काम करत असतात. हीच स्थिती एक्सरसाइज दरम्यानही होत असते. याने वजन वाढण्याचा धोका कमी होतो आणि वजन नियंत्रणात राहण्यात मदत मिळते.
हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी
नेहमी एकाच जागेवर बसून राहिल्याने किंवा एकाच जागी बसून काम करत असाल तर लठ्ठपणा वाढण्याचा, पोट बाहेर येण्याचा धोका अधिक असतो. अर्थात लठ्ठपणा वाढला की, हृदयांसंबंधी समस्या वाढतात हे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. उभे राहिल्याने ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रणात राहतं. ज्यामुळे हृदयासंबंधी समस्यांचा धोकाही कमी असतो.
कंबरदुखीपासून मिळते सुटका
दर दोन तासांनी उभे राहिल्याने किंवा फोन बोलण्यासाठी उभे राहिल्याने तुम्हाला कंबरदुखीपासून सुटका मिळू शकते. जर तुम्ही कामाच्या ठिकाणी सिट-स्टॅंड डेस्कचा वापर करत असाल तर याचाही फायदा तुम्हाला मिळू शकतो.
फॅट बर्न करा
जास्त वेळसाठी तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहिल्याने तुमचं मेटाबॉलिज्म स्लो होतं. तेच जर तुम्ही उभे राहिलात तर तुमचं मेटाबॉलिज्म योग्य राहतं. ज्यामुळे शरीरात जमा झालेलं फॅट बर्न करण्यास मदत मिळते.
वरील काही फायदे हे जास्त वेळ उभे राहिल्याने शरीराला मिळतात. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत उभे राहण्याचा वेळ वाढवला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला फिट राहण्यास मदत होईल. पण वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाइजशिवाय पर्याय नाही हेही तितकंच खरं आहे.