What are the benefits of consuming jaggery and milk together | रोज झोपण्याआधी गरम दुधासह गुळाचे सेवन कराल; तर 'या' ५ समस्यांसाठी दवाखान्यात जाणं विसराल

रोज झोपण्याआधी गरम दुधासह गुळाचे सेवन कराल; तर 'या' ५ समस्यांसाठी दवाखान्यात जाणं विसराल

हिवाळ्यामध्ये, सामान्यतः प्रत्येक घरात गूळाचा वापर वाढतो. गुळ डिटोक्सिफाइंग एजंट म्हणून कार्य करतो. जे शरीरात विषारी पदार्थांचे शुद्धीकरण करते.  लाडू, चपाती, पुरणपोळी अशा अनेक पदार्थांमध्ये हिवाळ्याच्या वातावरणात  गुळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अभ्यासानुसार मधुमेहाच्या रुग्णांना प्रोसेस्ड शुगरऐवजी गूळाचा वापरही सुरक्षित आहे. दुधामध्ये भरपूर कॅल्शियम, जीवनसत्त्वे-ए आणि बी, प्रथिनांसह इतर अनेक पोषक घटक असतात. चला  तर जाणून घ्या गरम दूध आणि गुळाच्या सेवानाने आरोग्याला  कोणते फायदे मिळतात.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

गरम दूध आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जर दररोज घेतले तर ते रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. म्हणून अशक्तपणा रोखण्यासाठी हे प्रभावी आहे आणि गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे. त्यात उपस्थित सुक्रोज शरीरातील उर्जा पातळी वाढवते आणि शरीराचा थकवा आणि अशक्तपणा कमी करते

त्वचा दिसते सुंदर आणि तरूण

गूळ आणि दुधात पुष्कळ पोषक घटक असतात ज्यामुळे आपल्या त्वचेत कोलेजन तयार होण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा  मऊ राहते. गूळ आणि दूधातील अमीनो एसिड त्वचेमध्ये मॉइश्चरायझेशनची पातळी राखतात. दुधात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आपल्याला अकाली होत असलेल्या आजारांपासून प्रतिबंधित करतात. त्यात उपस्थित लॅक्टिक एसिड एक्सफोलाइटिंग एजंट म्हणून कार्य करते आणि एंजाइम तयार करते. ज्यामुळे आपली त्वचा आणखी सुंदर बनते.

पचनक्रिया व्यवस्थित राहते

आतड्यांमधील अपचन, बद्धकोष्ठतेसह इतर अनेक समस्या टाळण्यासही गुळ व दूध प्रभावी आहे. गुळ व दुधामुळे पचन क्रिया सुधारते आणि पचन संबंधित समस्या कमी होतात. म्हणून, जेवणानंतर थोडासा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.  यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. 

हाडांसाठी फायदेशीर

गूळ आणि दूध दोन्ही हाडांसाठी फायदेशीर आहेत, म्हणून दुधात गूळ पिल्याने हाडे निरोगी होतात, स्नायूंचे पोषण होते, तसेच सांधेदुखीसारख्या हाडांच्या, सांध्याशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

दात आणि दाढी चांगल्या राहतात

दुधाचे आणि गुळाचे सेवन केल्यास पोकळी आणि दात किडणे टाळता येते. दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. मुलांना विशेषत: त्यांच्या विकासादरम्यान भरपूर प्रमाणात कॅल्शियमची आवश्यकता असते. दातांच्या आणि दाढेच्या आजारापासून बचाव करण्यासाठी  दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. 

तीव्रतेनं जाणवणारी डोकेदुखीसुद्धा असू शकते कोरोनाचं लक्षण; सामान्य त्रास की कोरोनाचं लक्षण?, असं ओळखा

पिरियड्सच्या वेदना कमी करते

गुळामधील पुष्कळ पोषक द्रव्यांमुळे, ते पीरियड्सशी संबंधित समस्यांमध्ये देखील खूप प्रभावी आहे. हे पीरियड्स दरम्यान अंगाचे आणि पोटातील वेदना कमी करण्यास मदत करते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहीती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. )

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: What are the benefits of consuming jaggery and milk together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.