शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Weight loss Tips: आरोग्य शास्त्रानुसार वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवे? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:30 IST

Weight loss tips: वजन कमी करण्यासाठी 'भरपूर पाणी प्या' हा सल्ला दिला जातो, पण भरपूर म्हणजे नेमके किती त्याचे प्रमाण आणि फायदे जाणून घ्या. 

वाढते वजन ही वेगाने वाढणारी समस्या आहे. सगळ्या वयोगटात वजन वाढीची समस्यां दिसून येत आहे. त्याला बहुतांश जबाबदार आहे आपली दिनचर्या आणि चुकीची आहारपद्धती. ज्याला खरोखरच वजन कमी करायचे आहे, त्यांनी आहार नियोजनाची शिस्त, पुरेसा व्यायाम, आठ तास झोप आणि बाहेरच्या खाण्यावर प्रतिबंध घातला पाहिजे. गोड आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. पोटापुरतेच जेवले पाहिजे. जिभेचे चोचले पुरवायचे या हेतूने अन्न ग्रहण करू नये. असे सल्ले आरोग्य शास्त्रात दिले जातात. त्याबरोबर एक उपाय सांगितला जातो, तो म्हणजे भरपूर पाणी पिण्याचा! पण भरपूर पाणी पिण्याने खरोखरच वजन कमी होते का? आणि झाले तरी त्यासाठी नेमके किती लिटर पाणी दररोज प्यायला हवे ते जाणून घ्या. 

पाणी पिण्याचा मुख्य फायदा म्हणजे त्यात शून्य कॅलरी असते. त्यामुळे ते कितीही प्यायले तरी वजन वाढत नाही, उलट भूक शमते, पोट भरलेले असल्याची तृप्ती मिळते, भूक कमी होते आणि वजन कमी करण्यात मदत होते. यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे असा वैद्यकीय सल्ला दिला जातो. अन्नात समाविष्ट असलेल्या पाण्याव्यतिरिक्त पाणी प्यायले गेले पाहिजे असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण नेमके किती? तेही पुढे जाणून घेऊया. 

वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग करावे का?

वॉटर फास्टिंग म्हणजे पाण्यावर राहून उपास. यासाठी कोणतेही डॉक्टर परवानगी देत नाही. या उपायाने तुम्ही सलग आठवडाभर तग धरून राहू शकता, वजनही कमी होऊ शकते, परंतु शरीरात त्राण उरणार नाही, भुकेचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकेल. म्हणून वैद्यकीय सल्ल्याशिवाय या गोष्टी करू नयेत. 

शीतपेय नको, पाणीच प्या: 

दुधाची तहान ताकावर भागवणे ठीक आहे, पण कोल्ड्रिंक वर नको! कोल्ड्रिंक वजनवाढीला पूरक आहे. म्हणून जेव्हा जेव्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरु कराल, तेव्हा तेव्हा कोल्ड्रिंकच्या जागी कोमट पाणी किंवा माठातले पाणी प्या आणि तहान भागवा. जेणेकरून पोट भरेल आणि कॅलरी पण वाढणार नाहीत. 

अधिक पाणी पिण्याच्या टिप्स

>> प्रत्येक वेळी काही खाण्याआधी पाणी प्या. त्यामुळे दोन घास कमी खाल्ले जातील. >> कुठेही जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि दर अर्ध्या तासाने एक एक घोट पाणी पित राहा. >> व्यायाम करताना किंवा शारीरिक कामे करताना जास्त पाणी प्या.>> दमट वातावरण तसेच प्रखर सूर्यप्रकाश असताना भरपूर पाणी प्या.>> झोपताना पाण्याची बाटली जवळ ठेवा. रात्री तहान लागल्यावर उठण्याचा कंटाळा करणार नाही. >> व्हेजिटेबल सूप तसेच वरण, आमटी, ताक यांचे प्रमाण जेवणात वाढवा. >> जास्त पाणी असलेली फळे आणि भाज्या खा, विशेषत: बेरी, द्राक्षे, कलिंगड, टोमॅटो, काकडी इ. चा वापर करा. 

नेमके किती पाणी प्यावे : 

आरोग्य शास्त्रानुसार स्त्रियांनी ८ ग्लास तर पुरुषांनी १३ ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होईल आणि वजन कमी व्हायला मदत होईल. 

टॅग्स :Healthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स