Weight Loss: सकाळी झोपेतून उठल्यावर करा हे 3 काम, काही दिवसात लठ्ठपणा होईल गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 13:14 IST2022-10-12T13:14:46+5:302022-10-12T13:14:50+5:30
Weight Loss Tips : जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज आम्ही तुम्हाला तीन उपाय सांगणार आहोत, जे तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर करायचे आहेत.

Weight Loss: सकाळी झोपेतून उठल्यावर करा हे 3 काम, काही दिवसात लठ्ठपणा होईल गायब
Morning Habits for Lose Weight: आजच्या धावपळीच्या जीवनात आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे जास्तीत जास्त लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रयत्न करूनही त्यांचं वजन कमी (Weight Loss) होत नाहीये. जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज आम्ही तुम्हाला तीन उपाय सांगणार आहोत, जे तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर करायचे आहेत. ज्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
सकाळी स्वत:ला करा हायड्रेट
सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी बॉडीला हायड्रेट करणं गरजेचं असतं. कारण झोपल्यानंतर बराच वेळ आपण काहीच खात नाही आणि पितही नाही. बॉडी हायड्रेट ठेवल्याने मेटाबॉलिज्म वाढतं आणि शरीरातील जास्तीत जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. सकाळी सकाळी साध्या पाण्यासोबत लिंबू पाणी प्यायल्याने, जीरं पाणी प्यायल्याने किंवा जीरं पाणी प्यायल्याने बॉडी हायड्रेट होते.
रोज 15 ते 20 मिनिटे वॉक किंवा एक्सरसाइज
वजन कमी करण्यासाठी फिलिकल अॅक्टिविटी फार गरजेची आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे वॉक किंवा एक्सरसाइज नक्की करा. त्यासोबतच हे कधीही मिस करू नका. सकाळी एक्सरसाइज किंवा वॉक केल्याने केल्याने कॅलरी जास्त बर्न करण्यास मदत मिळते. त्यासोबतच ब्लड शुगर लेव्हलही ठीक करण्यास मदत मिळते.
भिजवलेले ड्राई-फ्रूट्स खाण्याची सवय
अनेकदा बॉडीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन किंवा न्यूट्रिएंट्सची कमतरता असेल तर वजन कमी होऊ लागतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी भिजलेले ड्राई-फ्रूट्स खाण्याची सवय लावा. डाएटमध्ये आवश्यक ड्राई-फ्रूट्सचा समावेश केला तर अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता दूर होते.