शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

झटपट वजन कमी करायचंय?; ट्राय करा कोथिंबीर, लिंबू, आलं आणि काकडीचं 'हे' ड्रिंक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 1:42 PM

अनियमित जीवनशैली आणि आहार यांमुळे तुम्हीही वाढत्या वजनाच्या समस्यांचा सामना करत आहात का? मग आता टेन्शन सोडा, आम्ही तुम्हाला एक खास आणि सोपा उपाय सांगणार आहोत.

(Image Credit : novamedspa.com)

अनियमित जीवनशैली आणि आहार यांमुळे तुम्हीही वाढत्या वजनाच्या समस्यांचा सामना करत आहात का? मग आता टेन्शन सोडा, आम्ही तुम्हाला एक खास आणि सोपा उपाय सांगणार आहोत. आतापर्यंत तुम्ही वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले असतील. पण हा उपाय अत्यंत सोपा आणि फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा देणाऱ्या डाएटची गरज असते. कारण जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कमी डाएट घेत असाल तर ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. परंतु, या वेट लॉस डाएटमुळे तुम्ही तुमचं वजन अगदी सहज कमी करू शकता आणि ऊर्जेची कमतरताही भासणार नाही. 

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, वाढत्या वजनामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. डायबिटीस, हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर यांसारखे अनेक आजार जडण्याचाही धोका असतो. तरिदेखील आपण सर्वचजण आपल्या वाढणाऱ्या वजनाकडे दुर्लक्षं करतो. आम्ही येथे कोथिंबीर, लिंबू, काकडी, आलं या पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या अशा वेट लॉस डाएटबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे काही आठवड्यातच वजन कमी होण्यासाठी मदत होते. 

या पदार्थाचं सेवन कधी करणं फायदेशीर : 

द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज टिप्स फॉलो करत असता त्याचवेळी तुम्ही या पदार्थाचंही सेवन करू शकता. यासाठी तुम्हाला विशेष तयारीही करावी लागत नाही. 

घरामध्ये अगदी सहज आढळून येणाऱ्या 4 पदार्थांचा वापर करून तुम्ही अगदी सहज हा पदार्थ तयार करू शकता. यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. वेट लॉस डाएट तुम्ही दररोज रात्री झोपताना घेऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासोबतही याचं सेवन करू शकता. 

हा पदार्थ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 

  • कोथिंबीर 
  • काकडी
  • लिंबू
  • कोरफडीचा ज्यूस 

 

असं करा तयार : 

- सर्वात आधी कोथिंबीरी धुवून त्याची पानं वेगळी करून घ्या. - मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडीचे तुकडे घेऊन त्यामध्ये लिंबाचे पातळ स्लाइस एकत्र करा. - 30 मिली ग्रॅम कोरफडीचा ज्यूस मिक्सरमध्ये एकत्र करा. - सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्या. - तुमचं वेट लॉस हेल्दी ड्रिंक तयार आहे. 

वजन कमी करण्यासाठी करतं मदत : 

  • हे हेल्दी ड्रिंक वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कोथिंबीरीमध्ये आढळून येणारं  बिटा कॅरेटिन आणि व्हिटॅमिन सी वजन कमी करतं. 
  • याव्यतिरिक्त ड्रिंक तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेले सर्व पदार्थ मेटाबॉलिज्म वाढवतात आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 
  • हे ड्रिंक तुम्हाला ओव्हर इटिंगपासून दूर ठेवतं. ज्यामुळे तुम्ही जास्त कॅलरीपासून दूर राहतात. 
  • या ड्रिंकच्या सेवनाने शरीरामध्ये जमा झालेले एक्स्ट्रा फॅट्स बर्न होण्यास मदत होते. 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स